शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अरांता, करण यांची आगेकूच

By admin | Updated: June 7, 2015 00:41 IST

पीवायसी हिंंदू जिमखाना यांच्यातर्फे व डेक्कन जिमखाना यांच्या सहकार्याने आयोजित पहिल्या सिक्स् रेड स्नूकर अजिंंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत

पुणे : पीवायसी हिंंदू जिमखाना यांच्यातर्फे व डेक्कन जिमखाना यांच्या सहकार्याने आयोजित पहिल्या सिक्स् रेड स्नूकर अजिंंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत माजी राष्ट्रीय महिला खेळाडू अरांता सँचेस् आणि वाशीच्या करण मंगत या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. पीवायसी हिंंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्डस् हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत माजी राष्ट्रीय महिला खेळाडू अरांता सँचेस् हीने माजी भारतीय खेळाडू विचय निच्चाणीचा ४-३ (१८-४४, ६७-५५, 0७-४८, 0९-५०, ३८-२६, ३५-३०, ३१-१६) असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. चुरशीच्या लढतीत विजय निच्चाणीने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत अरांताविरूध्द ३-१ अशी आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या अरांताने उत्कृष्ट खेळ करीत पुढील तीनही फ्रेम जिंंकून विजय मिळवला. वाशीच्या करण मंगत याने शानदार खेळ करीत माजी आशियाई विजेत्या देवेंद्र जोशीचा ४-१ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. पीवायसीच्या योगेश लोहियाने औरंगाबादच्या ओमर फारूखीचा ४-२ असा तर, पीवायसीच्या निमिश कुलकर्णीने समीर बिडवईला ४-२ असे नमवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. सविस्तर निकाल दुसरी फेरी: मुकुंद भरडिया (बोरीवली) वि.वि. रोहन साकळकर (अ‍ॅपेक्स् स्पोर्टस्) ४-३ ; मनोज गाडगीळ (डेक्कन) वि.वि.राणा कडोळकर (पीवायसी) ४-२, राजवर्धन जोशी (पीवायसी) वि.वि. निनाद घाग (टेबल्स् ) ४-0 , कांकण शामसी (लखनऊ) वि.वि.सलिल देशपांडे (पीवायसी) ४-0 , निमिश कुलकर्णी (पीवायसी) वि.वि. समीर बिडवई ४-२, अभिनय एडके (डोंबिवली) वि.वि. सचिन संचेती (पीवायसी) ४-२;योगेश लोहिया (पीवायसी) वि.वि. ओमर फारूखी (औरंगाबाद) ४-२.