शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

स्मिथला बाद करण्याच्या सर्व योजना अपयशी

By admin | Updated: March 23, 2017 23:26 IST

भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यानची मालिका मैदानासोबत मैदानाबाहेरही खेळली जात आहे. आॅस्ट्रेलियन आजी-माजी क्रिकेटपटू भारतीय संघावर शाब्दिक हल्ले करीत आहेत.

नवी दिल्ली : भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यानची मालिका मैदानासोबत मैदानाबाहेरही खेळली जात आहे. आॅस्ट्रेलियन आजी-माजी क्रिकेटपटू भारतीय संघावर शाब्दिक हल्ले करीत आहेत. या वाक्युद्धामुळे सध्या सुरू असलेल्या मालिकेत वादाची स्थिती निर्माण झाली आहे. धरमशालामध्ये खेळल्या जाणाऱ्या निर्णायक कसोटीपूर्वी वाक् युद्धाने अधिक जोर धरला आहे. आॅस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंनी भारतीय कर्णधार विराट कोहलीला लक्ष्य केले आहे. कोहली भारतीय संघाचा आधारस्तंभ असल्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठविली आहे. कोहलीचे मनोधैर्य खचले, तर भारतीय संघाला पराभूत करण्यास अधिक वेळ लागणार नाही, याची आॅस्ट्रेलियन संघाला चांगली कल्पना आहे. पण, टीका करण्यात आॅस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल या सर्वांच्या पुढे आहेत. त्यांनी केवळ कोहलीच नाही, तर भारतीय संघाच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इयान चॅपेल यांच्या मते, आॅस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथला या कसोटी मालिकेत बाद करण्याच्या भारताच्या सर्व योजना संपल्या आहेत. या ४ कसोटी मालिकेत स्मिथ ३७१ धावा काढून सर्वाधिक धावा फटकावणारा खेळाडू आहे. तीन सामन्यांत त्याने आतापर्यंत दोन शतके ठोकली आहे. त्यामुळे भारतीय संघ स्मिथला बाद करण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे स्पष्ट होते, असेही चॅपेलने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)