अजय उप-उपांत्यपूर्व फेरीत

By Admin | Updated: October 14, 2016 01:00 IST2016-10-14T01:00:25+5:302016-10-14T01:00:25+5:30

भारताचा अव्वल मानांकित अजय जयराम आणि ११वा मानांकित पारुपल्ली कश्यप यांनी आपल्या लौकिकानुसार विजयी आगेकूच करताना डच ओपन

Ajay in sub-quarter-finals | अजय उप-उपांत्यपूर्व फेरीत

अजय उप-उपांत्यपूर्व फेरीत

अल्मेर (हॉलंड) : भारताचा अव्वल मानांकित अजय जयराम आणि ११वा मानांकित पारुपल्ली कश्यप यांनी आपल्या लौकिकानुसार विजयी आगेकूच करताना डच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जयरामने बल्गेरियाच्या फिलिप शिशोवला, तर कश्यपने डेन्मार्कच्या रेसमस जैमकेला धक्का देत आगेकूच केली.
कारकिर्दीमध्ये तब्बल तीन वेळा डच ओपनचे जेतेपद पटकावलेल्या जयरामने एकतर्फी झालेल्या सामन्यात वर्चस्व राखताना फिलिपविरुद्ध २१-७, २१-९ अशी जबरदस्त बाजी मारली. सामन्यात प्रतिकाराची कोणतीही संधी न देताना जयरामने फिलिपचे सहजपणे आव्हान संपुष्टात आणले. त्याचवेळी, तीन गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना पी. कश्यपने डेन्मार्कच्या जैमके याचे कडवे आव्हान २१-११, ७-२१, २१-१० असे परतावले. उपांत्यपूर्व फेरीत जागा निश्चित करण्यासाठी जयरामपुढे नॉर्वेच्या मॅरियस माइरी याचे, तर कश्यपपुढे सहाव्या मानांकित एस्तोनियाच्या रॉल मस्टचे कडवे आव्हान असेल.

Web Title: Ajay in sub-quarter-finals