शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

केकेआरसमोर १८६ धावांचे आव्हान

By admin | Updated: May 2, 2016 21:37 IST

कर्णधार विराट कोहली, के राहूल आणि शेन वॅटसनच्या दमदार खेळीच्या जोरावर आरसीबीने निर्धारीत २० षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात १८५ धावा केल्या. केकेआरला विजयासाठी २० षटकात १८६ धावांची गरज आहे.

ऑनलाइन लोकमत
बेंगळुरू. दि, २ : कर्णधार विराट कोहली, के राहूल आणि शेन वॅटसनच्या दमदार खेळीच्या जोरावर आरसीबीने निर्धारीत २० षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात १८५ धावा केल्या. केकेआरला विजयासाठी २० षटकात १८६ धावांची गरज आहे. 
स्फोटक फलंदाज ख्रिस गेल लदकर बाद झाल्यानंतर RCB संघावर थोडे दडपण आले पण. कर्णधार कोहली आणि के. राहूल यांनी सुरवातीला संयमी फलंदाजी करताना दुसऱ्या विकेटसाठी ९.४ षटकात ८४ धावांची भागीदारी केली. के राहूलने स्फोटक फलंदाजी करताना ३२ चेंडूत ५२ धावा केल्या. के राहूल बाद झाल्यानंतर आलेला डिव्हीलर फार काळ मैदानावर टिकला नाही धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात ४ धावावर बाद झाला. कोहलीने कर्णधाराला साजेशी फलंदाजी करताना संयमी ५२ धावांची खेळी केली.
 
आघाडीचे सर्व फलंदाज बाद झाल्यानंतर शेन वॅटसनने सचिन बेबीला सोबत घेत हाणामारीच्या षटकात धावसंख्या वाढवण्याचे काम चोख बजावले. वॅटसन-सचिन बेबीने ५व्या विकेटसाठी २.२ षटकात ३८ धावांची भागीदारी केली. वॅटसनने २१ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३४ धावा केल्या. सचिन बेबीने ८ चेंडूत १६ धावा केल्या. त्याने २ चौकार आणि १ षटकात लगावला. बेबी बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या बिन्नीने ४ चेंडूत १६ धावा केल्या. 
 
केकेआरकडून स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलर्स आणि के. राहूलला चावलाने बाद केले. तर ख्रिस गेल आणि कर्णधार कोहलीला मॉर्केलने बाद केले. चावला-मॉर्केल सोडता इतर गोलंदाजाना आपली छाप सोडता आली नाही. १९ व्या षटकात रसेलने सचिन बेबीला बाद केले. तोपर्यंत सचिन बेबीने आपले काम फत्ते केले होते. यादवने ४ षटकात ५६ धावांच्या मोबदल्यात १ गडी बाद केला. 
 
नाईट रायडर्सने संघाने ७ सामन्यात ८ गुणांची कमाई केली असून, हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. या संघाने चार सामने जिंकले आहे तर तीन सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. आरसीबी संघाने सहा सामन्यांत केवळ दोन विजय मिळविले असून, चार गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. केकेआर आणि आरसीबी या दोन्ही संघांना गेल्या लढतींमध्ये अनुक्रमे दिल्ली डेअरडेव्हिल्स व सनरायझर्स हैदराबाद संघांविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.