शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा ‘मंकीगेट’चे भूत

By admin | Updated: November 9, 2014 23:22 IST

मंकीगेट’ प्रकरणातील वादाची मालिका अद्याप संपलेली नाही. क्रिकेट आॅस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूला खाली पाहायला लावण्यापेक्षा भारताचा खोटारडेपणा उघड पाडणे आवश्यक होते

सिडनी : ‘मंकीगेट’ प्रकरणातील वादाची मालिका अद्याप संपलेली नाही. क्रिकेट आॅस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूला खाली पाहायला लावण्यापेक्षा भारताचा खोटारडेपणा उघड पाडणे आवश्यक होते, असे आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अ‍ॅलन बॉर्डरने व्यक्त केले आहे. ‘क्रिकेट एस आय सी इट’ या पुस्तकामध्ये १९८७ च्या विश्वविजेत्या संघाचा कर्णधार बॉर्डरने हरभजन सिंग आणि अ‍ॅण्ड्य्रू सायमन्ड्स यांच्यादरम्यान घडलेल्या प्रकरणावर आपली बाजू मांडली. २००७-०८ च्या वादग्रस्त आॅस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने हरभजनवर लावलेली तीन सामन्यांची बंदी रद्द करण्यात आली नाही तर दौरा सोडण्याची धमकी दिली होती. बॉर्डरने पुस्तकात लिहिले आहे की, ‘त्यावेळी माझा क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या बोर्डामध्ये समावेश होता. आम्ही आयसीसीच्या अपीलची चौकशी आणि निकाल स्वीकारला होता, पण मला तसे कधीच वाटले नाही. आम्ही सायमन्ड्सला एकटे सोडले. या कृतीला माझा विरोध होता.’बॉर्डर म्हणतो, ‘बोर्डाचे म्हणणे होते की, आम्ही भारताला दौरा सोडून जाऊ देऊ शकत नाही, पण नैतिकतेचा विचार केला तर भारताचा खोटारडेपणा उघड करणे आवश्यक होते.’ (वृत्तसंस्था)