शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

द. आफ्रिकेचा विजयी ‘चौकार’

By admin | Updated: October 11, 2016 04:40 IST

वेगवान गोलंदाज आणि सामनावीर ठरलेल्या काएल एबॉटच्या (४/४०) भेदक गोलंदाजीनंतर कर्णधार फाफ डू प्लेसिसने (६९) झळकावलेल्या

पोर्ट एलिझाबेथ : वेगवान गोलंदाज आणि सामनावीर ठरलेल्या काएल एबॉटच्या (४/४०) भेदक गोलंदाजीनंतर कर्णधार फाफ डू प्लेसिसने (६९) झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने सलग चौथा विजय मिळविताना जगज्जेत्या आॅस्टे्रलियाचा ६ विकेटने पराभव केला. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकाने ४-० अशी एकतर्फी आघाडी घेत कांगारुंना क्लीन स्वीप देण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे.रविवारी सेंट जॉर्ज पार्क स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात पाहुण्या आॅस्टे्रलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, एबॉटने कर्णधार स्टीव्ह स्मिथचा निर्णय चुकीचा ठरवताना आॅसीच्या अ‍ॅरॉन फिंच - डेव्हिड वॉर्नर या आक्रमक सलामी जोडीला स्वस्तात बाद केले. यानंतर दबावाखाली आलेल्या आॅस्टे्रलियाची कामगिरी अखेरपर्यंत सुधारली नाही आणि ठराविक अंतराने यजमानांनी बळी घेत आॅस्टे्रलियाचा डाव ३६.४ षटकांत १६७ धावांमध्ये गुंडाळला. एबॉटने ४ बळी घेत आॅसीला धक्के दिले. तर, तबरेज शम्सी याने ३६ धावांत ३ बळी घेतले. आॅस्टे्रलियाकडून यष्टिरक्षक मॅथ्यू वेड (५२) आणि मिशेल मार्श (५०) यांनी कडवा प्रतिकार केला.यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना यजमानांची सुरुवातही अडखळती झाली. हाशिम आमला (४), क्विंटन डीकॉक (१८) झटपट परतल्यानंतर फाफ डू प्लेसिस (६९) जेपी ड्यूमिनी (२५) आणि रिली रोस्सो (नाबाद ३३) यांनी संघाला सलग चौथा विजय मिळवून दिला. आॅसीकडून ख्रिस टे्रमेन याने २ बळी घेतले. या मालिकेतील अखेरचा सामना १२ आॅक्टोबरला केपटाऊन येथे खेळला जाईल. (वृत्तसंस्था)