अकम जोड २
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
भारतीय संघ गेल्या तीन महिन्यांपासून ऑस्ट्रेलियात असल्यामुळे रविवारच्या लढतीत त्यांचे पारडे जड मानल्या जात आहे. पण, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांना विजयाची चव चाखता आलेली नाही. पाकिस्तान संघाने दोन्ही सराव सामन्यांत लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केलेला आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे.
अकम जोड २
भारतीय संघ गेल्या तीन महिन्यांपासून ऑस्ट्रेलियात असल्यामुळे रविवारच्या लढतीत त्यांचे पारडे जड मानल्या जात आहे. पण, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांना विजयाची चव चाखता आलेली नाही. पाकिस्तान संघाने दोन्ही सराव सामन्यांत लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केलेला आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. रविवारच्या लढत म्हणजे भारतीय फलंदाजी व पाकिस्तानी गोलंदाजी यांच्यादरम्यानची लढत आहे. यावेळी मात्र पाकिस्तान संघात गोलंदाजीमध्ये मोठ्या नावांचा अभाव दिसतो. उभय संघांची गोलंदाजीची बाजू सारखीच असल्याचे भासते. आफ्रिदीचा (जवळजवळ ३०० सामने खेळण्याचा अनुभव असलेला) अपवाद वगळता उर्वरित गोलंदाज नवखे आहेत. त्यामुळे या खेळपट्टीवर फलंदाजी ही महत्त्वाची बाब ठरणार आहे. दुखापतींचा फटका दोन्ही संघांना बसला आहे. जुनेद व ईशांत विश्वकप स्पर्धेत नाहीत. विश्वकप स्पर्धेतील कामगिरी बघता पाकिस्तान संघावर अधिक दडपण राहील. सराव सामन्यातील मिळवलेले विजय पाक संघासाठी जमेची बाजू आहे. पाकिस्तान संघाने दोन्ही सराव सामन्यात ५० षटके खेळण्याची क्षमता असल्याचे सिद्ध केले आहे. भारतीय संघाला अनुभवी ईशांतची उणीव भासणार आहे. मोहितचा पर्याय चांगला आहे. त्याच्याकडे वेगात बदल करण्याचे कौशल्य चांगले आहे. नव्या चेंडूने गोलंदाजी करण्यासाठी तो चांगला पर्याय ठरू शकतो. (टीसीएम)