धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:11 IST2025-11-26T11:08:45+5:302025-11-26T11:11:01+5:30
रोहतकमध्ये एका राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडूचा सरावा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. सराव करत असताना अचानक त्याच्या छातीवर बास्केटबॉलचा खांब पडला. यामुळे तो गंभीर जखमी झाला.

धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
हरयाणा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लाखनमाजरा या गावातील १७ वर्षीय हार्दिक राठी राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू याच्या अंगावर बास्केटबॉलचा खांब पडला. यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हार्दिक राठीने तीन सब-ज्युनियर राष्ट्रीय आणि एका युवा राष्ट्रीय स्पर्धेत खेळला होता. त्याची बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या इंदूर अकादमीत निवड झाली होती.
हार्दिक राठी अकादमीकडून फोनवरून सरावासाठी बोलावले जात होते. हार्दिक आता गावातच सराव करत होता. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता हार्दिक अकादमीत सराव करत होता. त्यावेळी संघातील इतर खेळाडू बाजूला विश्रांती घेत होते.
उडी मारल्यानंतर पोल कोसळला
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हार्दिक उडी मारताना बास्केटचा खांब त्याच्या अंगावर पडतो. यावेळी जवळ उभे असलेले खेळाडूंनी काही सेकंदातच त्याला खांबाच्या खालून बाजूला केला. यावेळी त्यांनी लगेच त्याला रुग्णालयात दाखल केला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच लखन माजरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कुटुंबाच्या जबाबावरून कारवाई केली आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाखनमाजरा गावातील रहिवासी संदीप यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा १६ वर्षीय हार्दिक हा राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू होता. हार्दिकच्या मृत्यूची संपूर्ण घटना मैदानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सीसीटीव्ही फुटेजनुसार, हार्दिक जमिनीवर सराव करत होता. उडी मारत असताना अचानक एक खांब हार्दिकवर पडला. त्याच क्षणी जवळ बसलेल्या खेळाडूंनी खांब उचलला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर गावात आणि क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे.