२२ वर्षांच्या फुटबॉलपटूचे मैदानातच निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 05:37 AM2022-12-02T05:37:14+5:302022-12-02T05:37:36+5:30

२०१९च्या २० वर्षांखालील विश्वचषकात देशाकडून खेळलेल्या बलंताला २०२१ या क्लबने संघात घेतले होते.

A 22-year-old footballer died on the field | २२ वर्षांच्या फुटबॉलपटूचे मैदानातच निधन

२२ वर्षांच्या फुटबॉलपटूचे मैदानातच निधन

Next

तुकुमन : कोलंबियाचा २२ वर्षांचा मिडफिल्डर ॲन्ड्रेस बलंता याचे मंगळवारी प्रथम श्रेणी एटलेटिको तुकुमनचे सराव शिबिर सुरू असताना मैदानात कोसळताच निधन झाले. डॉक्टरांनी त्याचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांना अपयश आले.

२०१९च्या २० वर्षांखालील विश्वचषकात देशाकडून खेळलेल्या बलंताला २०२१ या क्लबने संघात घेतले होते. २०१९ ला देखील बलंता मैदानात कोसळला होता. त्यावेळी ग्लुकोजच्या कमतरतेमुळे त्याची शुद्ध हरपल्याचे डॉक्टरांनी म्हटले होते.

Web Title: A 22-year-old footballer died on the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.