शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

ऑईल मिलचे ७० हजारांचे भंगार चोरीस

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

लासूर स्टेशन: मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून बंद ऑईल मिलचे ७० हजारांचे भंगार सोमवारी (दि. १५) पहाटे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.

लासूर स्टेशन: मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून बंद ऑईल मिलचे ७० हजारांचे भंगार सोमवारी (दि. १५) पहाटे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
लासूर स्टेशनलगत असलेल्या देवगाव रस्त्यावरील बंद राज ऑईल मिलमधील भंगार नेणे सोपे व्हावे म्हणून बाजूला असलेल्या सराफ मंगल कार्यालयाची मुख्य गेटची कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. शेजारीच असलेल्या मिलच्या कुंपणाच्या तारा तोडून शटर उघडून मिलमधील लोखंडी बार, लोखंडी साहित्य एका गाडीत भरून नेले.
शेतात उमटलेल्या पायाच्या खुनावरून पाच-सहा चोरटे असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. संतोष कर्नावट यांनी दिलेल्या फिर्यादीत ७० हजारांचे भंगार चोरी गेल्याचे म्हटले आहे़ गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे या परिसरातील लाईटचे खांब पडल्यामुळे या परिसरात लाईट चार दिवसांपासून नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
दोन दिवसांपूर्वी याच परिसरातील चोरट्यांनी विद्युत डीपी लांबविली होती़ याबाबत संतोष कर्नावट यांनी शिल्लेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे, अशोक गंगावणे करीत आहे.