शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

२००८ - राजस्थान रॉयल्स ठरला विजेता

By admin | Updated: April 8, 2015 14:58 IST

३९ वर्षीय शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली खेळणा-या राजस्थान रॉयल्सने पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले.

फुटबॉलमधील प्रिमियर लीगच्या धर्तीवर भारतात ललित मोदींच्या सुपीक डोक्यातून आयपीएलची भन्नाट संकल्पना उदयास आली. इंडियन क्रिकेट लीगला टक्कर देण्यासाठी मोदींनी आयपीएलचा घाट घातला. बॉलीवूड व उद्योग क्षेत्रातील दिग्गजांचा शिरकाव, खेळाडूंवर लागणारी कोट्यावधींची बोली, टी - २० च्या सामन्याला ग्लॅमरची खमंग फोडणीच्या आधारे आयपीएलचे पहिले पर्व चांगलेच लोकप्रिय झाले. आंतररराष्ट्रीय खेळाडूंच्या समावेशामुळे आयपीएलकडे जगभराचे लक्ष वेधले गेले.
पहिल्या पर्वात आठ संघ सहभागी होती. प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे होते. १८ एप्रिल २००८ रोजी बंगळुरुतील स्टेडियमवर आयपीएलचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडला. पहिल्याच सामन्यात ब्रँडन मॅक्यूलमने ७८ चेडूंमध्ये १५८ धावांची विस्फोटक खेळी करत आयपीएलचा दिमाखदार शुभारंभ केला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत २२२ धावांचा डोंगर रचला. या सामन्यात बंगळुरुचा १४० धावांनी पराभव झाला. पहिल्याच सामन्यातील या थराराने आयपीएलची उत्कंठा वाढवली. 
अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज हे संघ आमने सामने होते. चांगली सुरुवात करुनही चेन्नई सुपरकिंग्जला २० षटकांत अवघ्या १६२ धावाच करता आल्या. राजस्थान रॉयल्सची सुरुवात फारशी चांगली नव्हती. ७ व्या षटकांत ४२ धावांमध्ये त्यांनी तीन गडी गमावले होते. मात्र त्यानंतर युसूफ पठाण व शेन वॉटसन या जोडीने ६५ धावांची भागीदारी करत राजस्थान रॉयल्सला विजयाच्या दिशेने नेले. शेन वॉर्न व सोहेल तनवीर या जोडीने छोटी पण महत्त्वाची भागीदारी करत संघाला पहिल्या वहिल्या आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. ३९ वर्षीय शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली  खेळणा-या राजस्थान रॉयल्सने जेतेपद पटकावत सर्वांनाच धक्का दिला. युसूफ पठाण या राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला.