World women's boxing : Jamuna Boro's winning start | जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद : जमुना बोरोची विजयी सुरुवात
जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद : जमुना बोरोची विजयी सुरुवात

उलान उदे : जमुना बोरो (५४ किलो) हिने महिला विश्व बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताला शानदार सुरुवात करुन देताना उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बोरोने मंगोलियाच्या मिचिडमा एर्डेनेडालाईचा ५-० ने पराभव केला. आता तिला अल्जेरियाच्या पाचव्या मानांकित उदाद फाऊच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

जागतिक अजिंक्यपद २०१७ च्या सुवर्णपदक विजेत्या फाऊला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. शनिवारी नीरज (५७ किलो) व स्वीटी बुरा (७५ किलो) यांचे सामने रंगतील. नीरजची लढत चीनच्या कियाओ जीरूसोबत होईल, तर स्वीटी मंगोलियाच्या म्यागमाजगराल एमविरुद्ध लढेल. या स्पर्धेत ५७ देशांचे २२४ बॉक्सर्स सहभागी झाले आहेत. (वृत्तसंस्था)
 

Web Title: World women's boxing : Jamuna Boro's winning start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.