शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

खाद्यतेलासह मूग, उडीद डाळ शंभरीपार झाल्याने महिला नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 12:28 AM

महागाईने सामान्यांची होरपळ

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पेट्रोल, डिझेल, गॅसच्या भाववाढीनंतर खाद्यतेल, डाळींच्या किमतीने शंभरी पार केली आहे.  त्यामुळे गृहिणींचे आर्थिक गणित बिघडले आहे. प्रत्येक वस्तूमागे ३० ते ५० रुपयांपर्यंत वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. महागाई विरोधात नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

कोरोनाच्या टाळेबंदीनंतर किराणामालाच्या दरात  चढ-उतार होत होता. परंतु गेल्या महिन्यापासून खाद्यतेलासह डाळींच्या किमतीने शंभरी पार केली आहे. सद्य:स्थितीत मूगडाळ १०१ रुपयांनी खरेदी करावी लागत आहे, तर उडीद दाळ ११४ रुपयांवर गेली आहे.  खाद्यतेलात लीटरमागे ४० रुपयांची भाववाढ झाली आहे. कोरोनामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडलेय. त्यात काहींच्या नोकऱ्या गेल्यात, तर काहीजण नोकरीच्या शोधात आहेत. 

त्यात महागाईच्या झळा बसत असल्याने रहिवाशी पूर्णपणे हतबल झाले आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅसवाढ झाली. आता किराणामालात भाववाढ झाल्याने पोट भरावे तरी कशाने असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गॅस महागल्याने गृहिणी चुलीवर स्वयंपाक करत आहेत. कामावर जाताना गाडी घरी लावून बस तसेच खासगी वाहनांचा आधार घेतला जात आहे. डाळीने शंभरी पार केली असली तरी त्याकरिता पर्याय उरला नसल्याने रहिवाशांना किराणा माल खरेदी करावाच लागत आहे.  

मागील वर्षीच्या  आणि आताच्या किमतीत ३० ते  ५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे भल्याभल्यांचे अंदाज चुकले आहेत. 

पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे. आता तर खाद्यतेलासह डाळीच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे घर चालवणे कठीण झाले आहे. काम करून तुटपुंज्या मिळणाऱ्या मजुरीतून काय सामान खरेदी करावे हा मोठाच प्रश्न पडला आहे. कोरोनामुळे हाताला काम नाही त्यात महागाईने कंबरडे मोडले आहे.     - सावित्रीबाई पवार, गृहिणी 

गत वर्षापेक्षा यंदा डाळ आणि तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे, तर गहू, साखरेच्या किमती  स्थिर आहेत. खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे, जास्त प्रमाणात माल खरेदी करणाऱ्या दुकानदारांना तोटा सहन करावा लागत आहे. मोठ्या दुकानात थोडेफार सामान स्वस्त मिळत असल्याने ग्राहक येथे गर्दी करतात. मात्र लहान दुकानदारांचे यात मरण होत आहे.     - सचिन गलानी, दुकानदार