कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू, ४ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 08:26 IST2025-08-12T08:26:34+5:302025-08-12T08:26:34+5:30

पनवेल तालुका पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Woman dies 4 injured in car collision in New Panvel | कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू, ४ जखमी

कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू, ४ जखमी

नवीन पनवेल : कारला धडक दिल्याने दुसरी कार दुभाजकाला धडकून पलटी झाली. या भीषण अपघातात अस्फिया बानू मोहम्मद फरीद खान (२२) हिचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नूर आलम खान चालवत असलेल्या कारमध्ये चार प्रवासी बसले होते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून ते लोणावळा येथे जात होते. नूर याने भरधाव कार चालवली आणि पुढे असलेल्या कारला धडक दिली. त्यामुळे ती कार सिमेंट ब्लॉकच्या दुभाजकाला धडकली आणि पलटी झाली. अपघातात कारमधील अस्फिया बानू मोहम्मद फरीद खान हिचा मृत्यू झाला, तर कारचालक नूर आलम खान, मोहम्मद अरबाज मोहम्मद अहमद, मोहम्मद अरिफ मोहम्मद अझम, रिजवान (सर्व रा. रायबरेली, उत्तर प्रदेश) जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
 

Web Title: Woman dies 4 injured in car collision in New Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.