मुलीसह महिलेची आत्महत्या; पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:12 IST2025-03-19T14:11:43+5:302025-03-19T14:12:01+5:30

पतीचे अन्य स्त्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याने तो आपल्या मुलीला मारहाण करायचा. यातूनच तिचा छळ करून त्याने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार मयत महिलेच्या आईने केली होती.

Woman commits suicide with daughter; husband arrested | मुलीसह महिलेची आत्महत्या; पतीला अटक

मुलीसह महिलेची आत्महत्या; पतीला अटक

नवीन पनवेल : पळस्पे येथील एका इमारतीच्या २९व्या माळ्यावरून पोटच्या मुलीस फेकून एका महिलेने स्वत:ही आत्महत्या  केल्याची घटना पनवेल येथे घडली होती. या प्रकरणी मयत मुलीच्या आईने पनवेल शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, आशिष हरिश्चंद्र दुवा (४१) याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली.

पतीचे अन्य स्त्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याने तो आपल्या मुलीला मारहाण करायचा. यातूनच तिचा छळ करून त्याने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार मयत महिलेच्या आईने केली होती. १२ मार्च रोजी पळस्पे फाटा येथील मॅरेथॉन नेक्सन औरा इमारतीच्या २९व्या मजल्यावरून आठ वर्षीय मायरा हिला तिच्या आई मैथिलीने बेडरूमच्या खिडकीतून बाहेर फेकले होते. यात तिचा मृत्यू झाला. 

त्यानंतर मैथिलीनेही उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात मैथिलीविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Web Title: Woman commits suicide with daughter; husband arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.