शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक मार्केटवर पाण्याची टाकी

By admin | Updated: August 26, 2015 22:55 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धोकादायक ठरलेल्या कांदा मार्केटमध्ये दुकानांवर पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. नियमबाह्यपणे टाकी बसविण्यासाठी

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धोकादायक ठरलेल्या कांदा मार्केटमध्ये दुकानांवर पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. नियमबाह्यपणे टाकी बसविण्यासाठी परवानगी देण्यात आली असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबईमध्ये ९२ धोकादायक वास्तूंमध्ये कांदा - बटाटा मार्केटचा समावेश आहे. मार्केटमधील व्यापारी गाळे कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असून मार्केटचा वापर बंद करण्याची नोटीस महापालिकेने दिली आहे. मार्केटमध्ये व्यापाऱ्यांच्या सुविधेसाठी प्रत्येक विंगमध्ये कँटीनची सोय केली आहे. सामुदायिक नळ दिला असून ठिकठिकाणी पाणपोयी उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येक विंगमध्ये सार्वजनिक प्रसाधनगृह उभारण्यात आले आहे. यामुळे व्यक्तिगत नळजोडणी देण्यात आलेली नाही. नियमाप्रमाणे कोणालाही वैयक्तिक नळजोडणी देता येत नाही व गाळ्यांवर पाण्याची टाकी बसविण्याची परवानगीही दिली जात नाही. परंतु नियम डावलून ई व इतर विंगमध्ये काही व्यापाऱ्यांनी पाण्याच्या टाक्या बसविल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अनधिकृतपणे बसविलेल्या काही टाक्या काढण्यात आल्या परंतु अद्याप काही ठिकाणी टाक्या जैसे थे असून संबंधितांवर कोणतीच कारवाई केली जात नाही. एपीएमसीतील व्यापारी महादेव राऊत यांनी अधिकृतपणे पाण्याची टाकी बसविण्याची परवानगी मागितली होती. परंतु त्यांना अशाप्रकारे पाण्याची टाकी बसविण्याची परवानगी दिली जात नसल्याचे लेखी उत्तर प्रशासनाने दिले आहे. परंतु दुसरीकडे ज्यांनी अनधिकृतपणे टाक्या बसविल्या आहेत त्यांना मात्र अभय दिले जात असून यामुळे मार्केटमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वांना समान नियम लावण्यात यावे अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)महापालिकेची नोटिसमार्केटमधील व्यापारी गाळे कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. मार्केटचा वापर बंद करण्याची नोटीस महापालिकेने दिली आहे.व्यापाऱ्यांच्या सुविधेसाठी प्रत्येक विंगमध्ये कँटीनची सोय केली आहे. प्रत्येक विंगमध्ये सार्वजनिक प्रसाधनगृह उभारण्यात आले आहे. यामुळे व्यक्तिगत नळजोडणी देण्यात आलेली नाही.