शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 12:39 AM

उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्यात येणार

- वैभव गायकरपनवेल : पनवेलमध्ये यंदा विक्र मी पावसाची नोंद झाली असली तरी शहरवासीयांची पाणीकपातीतून मुक्तता होणार नाही. शहरवासीयांच्या मागणीच्या तुलनेमध्ये धरणामध्ये कमी साठा आहे, यामुळे उपलब्ध जलसाठ्याचा काटेकोरपणे वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचाच भाग म्हणून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाणीकपात वेगवेगळ्या विभागात चार वेगवेगळ्या दिवशी केल्याने एकत्रितपणे पनवेलकरांवर त्याचा अतिरिक्त ताण पडणार नाही. महानगरपालिकेच्या मालकीच्या देहरंग (आप्पासाहेब वेदक) धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने या धरणाची साठवणूक क्षमता कमी झाली आहे. २६०० एमएलडी साठवणूक क्षमता असलेल्या या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने धरणाची साठवणूक क्षमता १७०० एमएलडीवर येऊन ठेपली आहे. यापैकी केवळ १५०० एमएलडी पाण्याचा वापर करता येतो. दरवर्षी उन्हाळ्यात पनवेलमध्ये प्रचंड पाणीसमस्या निर्माण होते.

सध्याच्या घडीला पनवेल शहराला सुमारे २८ ते ३० एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते, अशा परिस्थितीत देहरंग धरणातून १७ एमएलडी, एमजीपीकडून ४ ते ५ एमएलडी व एमआयडीसीकडून ६ एमएलडी पाण्याचे नियोजन केले जाते. विविध विभागांत केलेल्या पाणीकपातीमुळे आठवडाभरात सुमारे ६ ते ७ एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाण्याच्या तुटवड्यावर आताच नियोजन करण्याच्या दृष्टीने या बचतीमुळे महिन्याला सुमारे १२० एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. त्या दृष्टीने हे नियोजन केले असल्याचे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी उल्हास वाढ यांनी सांगितले.

शहरातील पाण्याचा तुटवडा लक्षात घेता एमजेपीकडे अतिरिक्त पाण्याची मागणी केली आहे. सोमवारी यासंदर्भात बैठकीचे आयोजन केले आहे. एमजेपीकडून अतिरिक्त ८ एमएलडी पाण्याची मागणी करण्यात आली आहे. हे पाणी मिळाल्यास शहरातील पाणीसमस्या दूर होण्यास मदत होणार आहे. यासंदर्भात पनवेल संघर्ष समितीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव वेलसरू यांना पत्र लिहून अतिरिक्त १५ एमएलडी पाणी पालिकेला देऊन रसायनी ते जेएनपीटी जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागणी अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केली आहे.

साठलेल्या गाळाचा सर्व्हे करणार

पनवेल तालुक्यात विक्र मी पावसाची नोंद या वर्षी झाली. सुमारे २९ वर्षांचा विक्र म या पावसाने तोडल्याने मोठ्या प्रमाणात गाळ देहरंग धरणात पोहोचल्याची शक्यता आहे. गाळ साचल्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होण्याची शक्यता असल्याने धरणात किती गाळ साचला आहे. यासंदर्भात सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा अधिकारी वाड यांनी दिली. उन्हाळ्यात पाण्याने तळ गाठल्यावर सर्व्हे करण्यात येणार आहे.

२०१८ पासूनच शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येतो. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या वर्षी आठवड्यातून एकदा विभागवार पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा इतर प्राधिकरणाकडून मिळेल, याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत.- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका

टॅग्स :WaterपाणीpanvelपनवेलMaharashtraमहाराष्ट्रNavi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका