युद्धामुळे महामुंबईवर १,५०० कोटींचा भार; देशाच्या अर्थव्यवस्थेवरही दरराेज लाखाे काेटींचा ताण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:23 IST2026-03-20T13:23:20+5:302026-03-20T13:23:20+5:30

इराण-इस्रायल-अमेरिका यांच्या अंदाजित ७५०० कोटींच्या युद्धखर्चापेक्षा भारताला बसत असलेला अंदाजे १५००० ते २२००० कोटींचा फटका अनेक पटींनी जास्त आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.

War puts a burden of Rs 1500 crore on Mumbai daily strain of lakhs of crores on the country's economy | युद्धामुळे महामुंबईवर १,५०० कोटींचा भार; देशाच्या अर्थव्यवस्थेवरही दरराेज लाखाे काेटींचा ताण

युद्धामुळे महामुंबईवर १,५०० कोटींचा भार; देशाच्या अर्थव्यवस्थेवरही दरराेज लाखाे काेटींचा ताण

नारायण जाधव -

नवी मुंबई : आखातातील संघर्ष तीव्र झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर लाखो कोटी रुपयांचा अतिरिक्त ताण पडत आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी, पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाच्या आकडेवारीचा आधार आणि तेल व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार क्रूड ऑइलच्या किमतीतील दरवाढीमुळे भारतावर रोज अंदाजे १५००० ते २२००० कोटी, तर महामुंबईवर १००० ते १५०० कोटींचा अतिरिक्त भार पडत आहे.

इराण-इस्रायल-अमेरिका यांच्या अंदाजित ७५०० कोटींच्या युद्धखर्चापेक्षा भारताला बसत असलेला अंदाजे १५००० ते २२००० कोटींचा फटका अनेक पटींनी जास्त आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. प्रतिबॅरल ७० डॉलर दर सध्या १०० ते ११०  डॉलरवर गेले आहे. आखातातील संघर्ष तीव्र झाल्यास हे दर  १२० डॉलर प्रतिबॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ५० ते ६० डॉलर प्रतिबॅरल दरवाढीमुळे भारतावर अतिरिक्त ५ ते ८ लाख कोटींचा अतिरिक्त वार्षिक भार पडण्याची भीती असून,१५००० ते २२००० कोटींचा भार देशावर पडत असल्याचा अंदाज आहे.

डिझेल खर्च झपाट्याने वाढण्याची शक्यता -
एकट्या मुंबई शहरावर अंदाजे ६०० ते ७५० कोटी, तर ठाणे-नवी मुंबईवर २५० ते ३५० कोटी दररोज मोजावे लागत आहेत. शिवाय इतर शहरांसाठीसुद्धा २०० ते ४०० कोटींचा भार दररोजचा वाढला आहे. भिवंडी-पनवेल परिसरातील लॉजिस्टिक्स हबमुळे डिझेल खर्च झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.

युद्धखर्च कोण किती करत आहे? -
इस्रायल : अंदाजे २०० ते ३०० दशलक्ष डॉलर अर्थात दररोज १६०० ते २५०० कोटी रुपये. (मिसाइल डिफेन्स, हवाई हल्ले, लष्करी ऑपरेशन्स)
इराण : अंदाजे १०० ते १५० दशलक्ष डॉलर अर्थात दररोज ८०० ते १२०० कोेटी रुपये (मिसाइल, ड्रोन, प्रॉक्सी वॉर)
अमेरिका : अंदाजे ३०० ते ५०० दशलक्ष डॉलर अर्थात दररोज २५०० ते ४००० कोटी रुपये. (युद्धनौका, विमानवाहू ताफा, मध्यपूर्वेत तैनाती, लॉजिस्टिक्स खर्च)
 

Web Title : युद्ध से मुंबई की अर्थव्यवस्था पर तनाव; भारत को प्रतिदिन अरबों का नुकसान।

Web Summary : मध्य पूर्व संघर्ष से तेल की कीमतें बढ़ीं, जिससे भारत को प्रतिदिन अरबों का नुकसान हो रहा है। अकेले मुंबई पर एक महत्वपूर्ण बोझ है, रसद के कारण डीजल की लागत बढ़ रही है।

Web Title : War strains Mumbai economy; India faces daily multi-billion losses.

Web Summary : Middle East conflict spikes oil prices, costing India billions daily. Mumbai alone bears a significant burden, with diesel costs soaring due to logistics.