शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीक्षा संपली, नवीन वर्षात धावणार नवी मुंबई मेट्रो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 01:35 IST

सिडकोच्या मार्फत नवी मुंबई मेट्रोसाठी २०२० मे महिन्याची नवीन डेडलाईन देण्यात आली आहे

वैभव गायकर

पनवेल : बहुप्रतीक्षित नवी मुंबईमेट्रोच्या उद्घाटनाला अखेर २०२० चे मुहूर्त मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी घाईघाईत मेट्रोची चाचणी घेण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रोची यशस्वी चाचणी पार पाडल्यानंतर नेमकी मेट्रो धावणार कधी? असा प्रश्न नवी मुंबईकराना पडला होता.

सिडकोच्या मार्फत नवी मुंबई मेट्रोसाठी २०२० मे महिन्याची नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. ११ स्थानकांचा समावेश असलेल्या ११ किमीच्या या मार्गाचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रोचा पहिला टप्पा आहे.२०११ मध्ये मेट्रोच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. चार हजार कोटीचा खर्च याकरिता अपेक्षित होता. मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याच्या डेडलाईन वारंवार बदल्यात आल्या. पहिली डेडलाईन २०१४ मध्ये देण्यात आली.विविध कारणांमुळे कामाचा वेग मंदावल्याने पुन्हा २०१५ त्यानंनतर २०१७ ची डेडलाईन सिडकोच्या वतीने देण्यात आली. मात्र ही डेडलाईनही चुकल्याने आता अखेर २०२० मध्ये मे महिन्यापर्यंत नवी मुंबई मेट्रो मार्गावर धावणार असल्याची माहिती सिडकोच्या माध्यमातून देण्यात आली आहे.पहिल्या टप्प्यादरम्यानच्या ११ स्थानकांच्या सजावटीचे काम सध्या वेगात सुरु आहे. स्टेशनवरील प्लॅटफॉर्म, ट्रॅक, सिग्नल, टेलिकम्युनिकेश उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरत लवकर हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित खारघरमधील भाजपच्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नवी मुंबई मेट्रोचा उल्लेख केला होता. खारघर वासियांना मेट्रोचा फायदा होणार असून शहरातील वाहतुक कोंडी या मेट्रोमुळे फुटणार आहे.तळोजाच्या प्रवेशद्वारावरलोखंडी पूलमेट्रोच्या कामादरम्यान तळोजाच्या प्रवेशद्वाजवळ सिडकोच्या माध्यमातून लोखंडी पूल उभारण्यात आले आहे. शंभर मीटर लांबीचा हा पूल उभारण्यासाठी सहा क्रेन, सिडकोसह रेल्वे अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा यावेळी उपास्थित होता. पुलाखालून मुंबई मडगाव रेल्वे मार्ग असल्याने रेल्वेचे अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.डेपोचे काम पूर्णमेट्रोकरिता सुमारे २६ हेक्टर जागेवर १३२ कोटी खर्चून अद्ययावत कारशेड, डब्यांची देखरेख दुरुस्ती आदींसाठी स्वतंत्र्य यंत्रणा उभारण्यात आली आहे. या डेपोचे काम पूर्णत्वाला आले आहे. या व्यतिरिक्त स्टेशन कॉम्प्लेक्सचे काम पूर्ण झाले आहे. नवी मुंबई मेट्रोचे डब्बे थेट चीनवरून नवी मुंबईत दाखल झाले आहेत.नवी मुंबई मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील वर्षी हे काम पूर्ण होणार असून मे महिन्यापर्यंत बेलापूर ते पेंधर या मार्गावर नवी मुंबई मेट्रो धावताना दिसेल.- प्रिया रातंबे (जनसंपर्क अधिकारी , सिडको )११ किमीच्या मार्गाचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्णस्थानकांच्या सजावटीचे काम सध्या प्रगतिपथावरनवी मुंबई शहरातील वाहतूक कोंडी फुटणार

टॅग्स :Metroमेट्रोNavi Mumbaiनवी मुंबई