शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.साठी २८ला मतदान

By admin | Updated: January 5, 2015 22:29 IST

नव्याने निर्माण झालेल्या पालघर व ठाणे या दोन जिल्हा परिषदांसह त्याअंतर्गत १३ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या

पालघर/ठाणे : नव्याने निर्माण झालेल्या पालघर व ठाणे या दोन जिल्हा परिषदांसह त्याअंतर्गत १३ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असून २८ जानेवारी रोजी मतदान होऊन ३० जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.निवडणुकीची आचारसंहिता सोमवारी रात्री १२ वाजेपासून लागू झाली आहे.तर अन्य जिल्ह्णांतील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकां याच वेळी होणार आहेत.या निवडणूक कार्यक्रमानुसार ८ ते १३ जानेवारी २०१५ या कालावधीत (११ जानेवारीचा सुटीचा रविवार वगळता) उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी त्या सोबत जातीचे व जातप्रमाणपत्रांचे वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. याशिवाय, छाननीच्या वेळी मूळ जातप्रमाणपत्र व जातप्रमाणपत्राचे वैधता प्रमाणपत्र तपासणीकरिता सादर करणे आवश्यक आहे.ठाणे जिल्ह्णाच्या ठाणे जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसह भिवंडी, शहापूर, कल्याण, अंबरनाथ आणि मुरबाड या पंचायत समित्यांच्या ११० गणांच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. याशिवाय, नवनिर्वाचित पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ गटांसह पालघर जिल्ह्णातील वसई, तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा आणि पालघर या पंचायत समित्यांच्या ११४ गणांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याप्रमाणेच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या भरणे (ता. खेड), रायगड जिल्हा परिषदेच्या नवघर (ता. उरण) व शहापूर (ता. अलिबाग) तर पुणे जिल्हा परिषदेच्या नाणेकरवाडी-चाकण (ता. खेड) व वालचंदनगर-कळस (ता. इंदापूर), अहमदनगर जिल्हा परिषदेच्या राजूर (ता. अकोले) व मिरी (ता. पाथर्र्डी) व कोळगाव (ता. श्रीगोंदा) या गटांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. याशिवाय, नाशिक जिल्ह्णातील येवला पंचायत समितीच्या सावरगाव, रायगड जिल्ह्णातील रोहा पंचायत समितीच्या भालगाव गणांची पोटनिवडणूक होणार आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता जारी राहील. निवडणुकांची घोषणा होताच सर्वच राजकीय पक्षांमध्ये चैतन्य संचारले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांत निर्माण झालेली मरगळ आता झटकली जाण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीची वृत्त कळताच भेटीगाठी आणि फोना फोनी सर्वत्र सुरू झाली. उद्यापासून राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ होईल. (प्रतिनिधी)