- सूर्यकांत वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई: महापालिका निवडणुकीत यंदा प्रथमच उद्धवसेना व मनसे एकत्र निवडणूक लढले. त्यामध्ये उद्धवसेनेचे दोन, तर मनसेचा १ उमेदवार निवडून आला आहे. उर्वरितांपैकी अनेकजण पराभूत होऊनही दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर आहेत. विधानसभा गत निवडणुकीच्या तुलनेत मनसेच्या मतांचा टक्का वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे नवी मुंबईत मनसे व उद्धवसेनेच्या युतीला किरकोळ फायदा झाल्याचे दिसते आहे.
सत्ताधारी भाजप व शिंदेसेनेविरोधात दंड थोपटत दोन ठाकरे बंधूंनी महापालिका निवडणुकीत टाळी दिली होती. त्यानुसार नवी मुंबईत युतीतूनमनसेने २५, तर उद्धवसेनेने ५६ जागा लढवल्या होत्या. त्यात काही अपक्षांनाही युतीने साथ दिली. या निवडणुकीच्या निकालाअंती नवी मुंबईत युतीला किमान फायदा झाल्याचे दिसले. मनसेचे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून होणाऱ्या आंदोलनातून टिकून असलेले अस्तित्व, तर जुन्या शिवसेनेला व उद्धव ठाकरेंना मानणारा शहरातील घटक, त्यांनी या युतीला मतांद्वारे साथ दिली.
महापालिका निवडणुकीत मनसेने खाते खोलले असून अभिजीत देसाई विजयी झाले आहेत.
युतीच्या उमेदवारांना २ लाख ६४ हजार मते मिळाली आहेत. त्यातून उद्धवसेनेचे दोन, तर मनसेचा एक उमेदवार निवडून आला आहे. त्याशिवाय ९ ठिकाणी उद्धवसेना व १ ठिकाणी मनसे दुसऱ्या स्थानावर आहे. मनसेचे विजयी उमेदवार अभिजित देसाई यांनी शनिवारी रात्री अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
विधानसभेपेक्षा पालिकेत ४२ मतांची झाली वाढविधानसभा निवडणुकीत मनसेचे बेलापूरमधून गजानन काळे, तर ऐरोलीतून नीलेश बाणखेले मैदानात उतरले होते. त्यावेळी काळेंना ११,९८०, तर बाणखेलेंना ४ हजार २३३ मते मिळाली होती. महापालिका निवडणुकीत मात्र मतांचा टक्का वाढल्याचे दिसून आले.बेलापूरमधून मनसेच्या 3 उमेदवारांना ५३ हजार, तर ऐरोलीतल्या ६ उमेदवारांना १५ हजार मते मिळाली आहेत. मनसेचा ऐरोलीत अद्यापही बेलापूर इतका बोलबाला नसल्याने कमीच उमेदवार उतरवले होते. त्यात विधानसभा लढवलेल्या नीलेश बाणखेले यांना ३,८४९ मते मिळावी आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मनसेच्या मते वाढली आहेत.
Web Summary : Uddhav Sena and MNS alliance saw increased votes in Navi Mumbai municipal elections. MNS won one seat, Uddhav Sena two. Overall, the alliance benefited slightly, increasing MNS's vote share compared to previous assembly elections.
Web Summary : नवी मुंबई नगर निगम चुनावों में उद्धव सेना और मनसे गठबंधन को अधिक वोट मिले। मनसे ने एक सीट, उद्धव सेना ने दो जीतीं। कुल मिलाकर, गठबंधन को थोड़ा फायदा हुआ, जिससे पिछले विधानसभा चुनावों की तुलना में मनसे के वोट शेयर में वृद्धि हुई।