शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तुर्भेच्या नवयुवक मंडळाला चपराक

By admin | Updated: September 15, 2015 23:32 IST

तुर्भेच्या नवयुवक गणेशोत्सव मंडळाला उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. परवानगीपूर्वीच रस्त्यावर मंडप उभारल्याने मंडळाविरोधात याचिका दाखल झाली होती.

नवी मुंबई : तुर्भेच्या नवयुवक गणेशोत्सव मंडळाला उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. परवानगीपूर्वीच रस्त्यावर मंडप उभारल्याने मंडळाविरोधात याचिका दाखल झाली होती. त्यावर निर्णय देत न्यायालयाने मंडळाला एक लाख रुपयांचा दंड सुनावला असून तो मुख्यमंत्री निधीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.रस्त्यावर उभारल्या जाणाऱ्या मंडपांमुळे वाहतूक कोंडी होवून नागरिकांना त्रास होत असतो. यावर तोडगा काढण्यासाठी यंदा प्रथमच नवी मुंबई पोलीस व पालिकेने ठोस पाऊल उचलत रस्त्यावर दहीहंडी तसेच गणेशोत्सव साजरा न करण्याच्या सूचना मंडळांना केल्या आहेत. त्यानुसार ७२ गणेशोत्सव मंडळांनी रस्ते मोकळे सोडून मैदाने गाठली आहेत. तर ३८ मंडळांनी पूर्ण रस्ता न व्यापता अवघ्या २५ टक्के भागातच मंडप उभारणी केली आहे. या मंडळांना परवानगीची प्रक्रिया सोपी करण्याच्या उद्देशाने प्रशासनाने एक खिडकी संकल्पना देखील राबवली होती. त्यानंतरही तुर्भेच्या नवयुवक मंडळाने नियम धाब्यावर बसवत परवानगीपूर्वीच रस्त्यावर मंडप उभारला होता. ठाणे - बेलापूर या रहदारीच्या मुख्य मार्गावरच हा मंडप असल्याने त्याठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. पालिकेनेही पाहणीदरम्यान या मंडळाला परवानगीपूर्वी मंडप न उभारण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी दाद दिली नव्हती. अखेर सामाजिक कार्यकर्ते संजय कोळेकर यांनी मंडळाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायाधीश अभय ओक व न्यायाधीश विजय अचलीया यांच्या खंडपीठाने आज निकाल दिला. परवानगीपूर्वीच रस्त्यावर मंडप उभारल्याप्रकरणी त्यांनी मंडळाला १ लाख रुपयांचा दंड सुनावला असून तो मुख्यमंत्री निधीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गणेशोत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषणासह इतर कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही असे प्रतिज्ञापत्रही मंडळाकडून बुधवारी लिहून घेतले जाणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने प्रशासन आपल्याच खिशात असल्याचा आव आणत नियम धाब्यावर बसवणाऱ्या मंडळांना चपराक बसली आहे. याबाबत नवयुवक मंडळाचे अध्यक्ष अशोक जोगदंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)मंडळाचे प्रतिनिधी तोंडघशी-गणेशोत्सवात होणाऱ्या खर्चाची चौकशी न्यायाधीशांनी मंडळाच्या प्रतिनिधीकडे केली होती. यावेळी श्रीमंतीचा आव आणत मंडळाच्या प्रतिनिधीने ८ ते ९ लाख रुपये खर्च होत असून दररोज ४०० ते ५०० भाविक भेट देत असल्याचेही सांगितले. -मात्र दंड स्वरूपात मुख्यमंत्री निधीसाठी किती रक्कम देणार याची विचारणा होताच मंडळाने हात आखडता घेत अवघ्या २५ हजार रुपयांची तयारी दाखवली. -यावेळी नियमांची पायमल्ली करणाऱ्या या मंडळावर ताशेरे ओढत खंडपीठाने त्यांना १ लाख रुपयांचा दंड सुनावला. तसेच गणेशोत्सव काळात कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाल्यास वेगळा दंड आकारला जाईल असाही इशारा दिला आहे.