शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गासह ठाणे-बेलापूर रोडवर वाहतूककोंडी

By admin | Updated: September 5, 2015 23:14 IST

तुर्भे उड्डाणपुलाखाली पडलेल्या खड्यांमुळे ठाणे बेलापूर रोड व सायन - पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी होवू लागली आहे. शनिवारी दिवसभर वाहतूक विस्कळीत झाली होती.

नवी मुंबई : तुर्भे उड्डाणपुलाखाली पडलेल्या खड्यांमुळे ठाणे बेलापूर रोड व सायन - पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी होवू लागली आहे. शनिवारी दिवसभर वाहतूक विस्कळीत झाली होती. खड्डे बुजविले जात नसल्यामुळे चालकांसह नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे -बेलापूर रोडवर तुर्भे उड्डाणपुलाखालील पोलिस चौकी ते शरयू हुंडाई कंपनीपर्यंत रोडवर प्रचंड खड्डे पडले आहेत. नागरिकांनी मागणी करूनही खड्डे बुजविले जात नसून वाहतूक कोंडी होत आहे. शनिवारी सकाळी ठाणे - बेलापूर रोडवर एस.के. व्हील्स कंपनीपासून तुर्भे नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 500 मिटरचे अंतर कापण्यासाठी १० मिनीट वेळ लागत होता. दुपारपर्यंत वाहतूक अत्यंत धिग्या गतीने सुरू होती. सायन - पनवेल महामार्गावरही पुलावरून सानपाडा सिग्नलपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. शहरातील दोन्हीही प्रमुख रोडवर चक्का जाम झाल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. या परिसरातील रहिवाशांनी व वाहतूकदारांनी खड्डे बुजविण्याची मागणी सार्वजनीक बांधकाम विभाग व महापालिका प्रशासनाकडे केली आहे. रोडच्या एक बाजूला महापालिकेची तर दुसऱ्या बाजूला सार्वजनीक बांधकाम विभागाची हद्द आहे. खड्डे कोणी बुजवायचे असा प्रश्न निर्माण झाला असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. लवकरात लवकर खड्डे बुजवून वाहतूकिची समस्या सोडविण्याची मागणी जोर धरू लागली असून आठ दिवसात खड्डे न बुजविल्यास आंदोलनाचा इशारा तुर्भे नाका परिसरातील रहिवाशांनी दिला आहे.