कैद्याची कारागृहातील डॉक्टरांना धमकी, खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 01:17 IST2020-01-26T01:17:37+5:302020-01-26T01:17:46+5:30
तळोजा कारागृहातील कैदी जोहरावर सिंग याने कारागृहातील डॉक्टर अमीत काळे यांना शनिवारी कारागृहात धमकाविल्या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैद्याची कारागृहातील डॉक्टरांना धमकी, खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पनवेल : तळोजा कारागृहातील कैदी जोहरावर सिंग याने कारागृहातील डॉक्टर अमीत काळे यांना शनिवारी कारागृहात धमकाविल्या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैद्याची नियमित तपासणी करताना जोहरावर सिंग याने डॉ काळेकडे तब्बेतीचा हवाला देत जे जे रुग्णालयात शिफ्ट करण्याचा आग्रह धरला जोहरावर यांची तब्बेत ठीक असल्याने डॉक्टरांनी याबाबत नकार दिल्यानंतर सिंग याने डॉ. काळे यांना धमकाविण्यास सुरुवात केली.
याप्रकरणी डॉ. काळे यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जोहरावर सिंग हा मागील तीन वर्षांपासून तळोजा कारागृहात गंभीर गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.