शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींसाठी अन्नसुरक्षाही नाही

By admin | Updated: October 6, 2016 03:36 IST

प्राथमिक सुविधा नसलेल्या रानसईमधील आदिवासींना दोन वेळचे अन्न मिळविण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे.

नामदेव मोरे , नवी मुंबई प्राथमिक सुविधा नसलेल्या रानसईमधील आदिवासींना दोन वेळचे अन्न मिळविण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. शिधावाटप विभाग प्रत्येक महिन्याला त्यांच्यासाठी धान्य, साखर व रॉकेलचा पुरवठा करत आहे. परंतु ते धान्य पूर्णपणे लाभार्थींपर्यंत पोहचतच नाही. अर्ध्या धान्यावर मध्यस्थ डल्ला मारत आहेत. गावात रेशन दुकान असल्याची नोंद सरकारी दप्तरी असली तरी प्रत्यक्षात धान्य आणण्यासाठी दोन तास पायपीट करून चिरनेरपर्यंत जावे लागत आहे. उरण तालुक्यामधील रानसई आदिवासी पाड्यांमधील समस्यांवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकल्यानंतर पूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शासकीय यंत्रणेचा अनागोंदी कारभार समोर येवू लागला आहे. प्रस्तावित विमानतळापासून जवळच असलेल्या या पाड्यांमधील रहिवाशांना प्राथमिक सुविधाही मिळत नाहीत. पावसाळ्यात भाजीपाला पिकवून उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासींना उन्हाळ्यात रोजगाराचे साधनच नाही. रोजगार हमी योजना व नरेगाची कामेही मिळत नाहीत. अशा स्थितीमध्ये दोन वेळचे जेवण मिळविण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. शासनाने आदिवासींना स्वस्त दरामध्ये धान्य पुरवठा करण्यासाठी गावामधील राया धानया शिंगवा याला शिधावाटप दुकान मंजूर करून दिले आहे. अनेक वर्षांपासून दुकान त्याच्या नावावर असले तरी प्रत्यक्षात दुकानाचा कारभार दुसरीच व्यक्ती पहात आहे. नियमाप्रमाणे आदिवासींना त्यांच्या पाड्यावर स्वस्त धान्य दुकानात धान्य उपलब्ध झाले पाहिजे. परंतु दुकान चिरनेरमध्ये असल्याने दोन तास पायी चालत जावे लागते व धान्य घेवून पुन्हा दोन ते अडीच तास चालून गावामध्ये यावे लागत आहे. रेशनवर महिन्यामधून फक्त एक दिवस धान्य दिले जाते. दुकानदाराने निरोप पाठविला की सर्व कामे सोडून रेशनसाठी जावे लागते. त्या दिवशी कोणी गेले नाही तर त्या महिन्याचे रेशनच दिले जात नाही. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरून रानसई गावाच्या धान्यपुरवठ्याविषयी माहिती घेतली असता अनेक आश्चर्यजनक गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. शासन प्रत्येक महिन्यामध्ये आदिवासींसाठी पूर्ण धान्याचे वितरण करत आहे. जानेवारी ते आॅगस्टपर्यंत प्रत्येक महिन्यात १७०० लिटर रॉकेलचा पुरवठा झाला आहे. प्रत्येक शिधापत्रिकाधारकास ५ लिटरप्रमाणे रॉकेलचा पुरवठा करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात १ ते २ लिटरच रॉकेल देण्यात येत असल्याची माहिती येतील रहिवाशांनी दिली आहे. जूनपर्यंत ३०८ शिधापत्रिका होत्या. जुलैमध्ये अचानक ४३९ शिधापत्रिका असल्याची नोंद आहे. अचानक एवढ्या शिधापत्रिका कशा वाढल्या याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जानेवारीपासून रानसईमधील प्रत्येक शिधापत्रिकाधारकासाठी २ किलो साखरेचा पुरवठा होणे अपेक्षित होते. परंतु तीही पूर्णपणे मिळालेली नाही. अंत्योदय योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला दहा किलो गहू व २५ किलो तांदूळ मंजूर असून तेही पूर्णपणे मिळत नसल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली आहे. आम्ही जगायचे कसे?रेशनवर पुरेसे धान्य मिळत नाही. दुकानदार सांगेल त्याच दिवशी जावून धान्य घ्यावे लागत आहे. वास्तविक आदिवासींसाठी रोजगाराचे काहीही साधन नाही. पावसाळ्यात भाजीपाला पिकवून उदरनिर्वाह केला जातो. उन्हाळ्यात पनवेल व उरण परिसरात जावून रोजंदारीची कामे करावी लागतात. रेशनवर धान्य मिळत नाही व महागाईमुळे बाहेरून खरेदी करणे परवडत नसल्याने आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे.