सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आणि बेभरवशी पावसामुळे उरणचे शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 09:02 PM2023-05-22T21:02:31+5:302023-05-22T21:02:52+5:30

प्रत्येक वर्षी कमी अधिक प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे.

The farmers of Uran are worried due to the possibility of less than average rainfall and unreliable rainfall | सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आणि बेभरवशी पावसामुळे उरणचे शेतकरी चिंतेत

सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आणि बेभरवशी पावसामुळे उरणचे शेतकरी चिंतेत

googlenewsNext

मधूकर ठाकूर, उरण : हवामान खात्याने यावर्षी महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत कमी पाऊस पडेल. हंगामाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे उरणकरांची चिंता वाढली आहे.

उरण तालुक्यात मागील पाच वर्षांपासून पावसाचा खेळ खंडोबा सुरू आहे.प्रत्येक वर्षी कमी अधिक प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे.त्यामध्ये आता अवकाळी, अवचित कोसळणाऱ्या पावसाची भर पडली आहे. ॠतु,बेॠतुत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.अधुन-मधुन शेतकऱ्यांना वादळं, चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीचाही सामना करावा लागत आहे.मानवाने निसर्ग आणि पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे. यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे.पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला आहे.त्यामुळे निसर्गाचे

ॠतुचक्रच बिघडले आहे.बिघडलेल्या ॠतुचक्राचा   निसर्ग आणि मानवी जीवनावर विपरीत परिणाम झाला असल्याचे तज्ञांकडून वारंवार सांगितले जात आहे.मात्र तज्ञांचे सल्ले मानव फारसे मनावर घेताना दिसत नाही.त्याचे परिणाम हळूहळू आता जाणवू लागले असल्याचे पर्यावरणवाद्यांकडून सांगितले जात आहे. 

दरम्यान उरण परिसरात मागील पाच वर्षांपासून कोसळणाऱ्या कमी अधिक पावसामुळे उरणकरांना दरवर्षीच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.तसेच शेतकऱ्यांसाठीही हा चिंतेचा विषय बनला आहे.यासाठी उरण तालुका कृषी अधिकारी किसन शिगवण यांनी मागील पाच वर्षांतील पावसाची आकडेवारीच दिली आहे.
 
उरण तालुक्यातील मागील पाच वर्षांची आकडेवारी
वर्ष               आकडेवारी 
२०१८.       २२८७.९७ मी.मि.
२०१९.        ३४१०.५० मी.मि.
२०२०.        २४२७. मी.मि.
२०२१.        २९२२. मी.मि.
२०२२.         २६३४. मी.मि.

Web Title: The farmers of Uran are worried due to the possibility of less than average rainfall and unreliable rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.