तळोजा नदी प्रदूषण; अधिकाऱ्यांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 23:42 IST2018-09-19T23:42:27+5:302018-09-19T23:42:58+5:30
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तळोजा नदी प्रदूषण; अधिकाऱ्यांवर गुन्हा
पनवेल : नदीप्रदूषणामुळे गणेश विसर्जनाला फटका बसल्या प्रकरणी सिडको नागरी घनकचरा प्रकल्पाच्या व्यवस्थापकांसह सिडको अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
घोटचाळ येथील डम्पिंग ग्राउंडमधून प्रक्रि या न करताच, प्रदूषित सांडपाणी नदीपात्रात सोडले जात होते, यामुळे नदीकिनारच्या गावांना अनेक वर्षांची गणपती विसर्जनाची परंपरा मोडून नाइलाजाने तलावात विसर्जन करावे लागले. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी रविवारी परिसराची पाहणी केली. सिडकोचे कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी, सिडकोचे कळंबोली नोडमधील सहायक कार्यकारी अभियंता खान, साइट इनचार्ज अविनाश पिसे (गिरीश इंटरप्रायझेस), तसेच प्रकल्प व्यवस्थापक घोरपडे (मे. खिरारी इन्फ्रा इंटरप्रायझेस, नवी मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.