शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तळोजात पाणीपुरवठा, विजेचे दुहेरी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:03 IST

सिडकोने वसवलेल्या तळोजा नोडला समस्यांचे ग्रहणच लागले आहे. आंदोलन, धरणे, मोर्चे काढूनही समस्यांचे निराकरण होत नसल्याने रहिवासी त्रस्त आहेत.

पनवेल : सिडकोने वसवलेल्या तळोजा नोडला समस्यांचे ग्रहणच लागले आहे. आंदोलन, धरणे, मोर्चे काढूनही समस्यांचे निराकरण होत नसल्याने रहिवासी त्रस्त आहेत. अपुरा व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा व वारंवार खंडित होणाºया विजेने नागरिक हैराण झाले आहेत. या ठिकाणी दिवसातून पाच ते सहा वेळा अघोषित लोडशेडिंग असल्याने स्थानिकांमध्ये महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी आहे.रविवारीदेखील सकाळपासूनच वारंवार वीजपुरवठा खंडित झाला होता. परिणामी, अनेक इमारतींमधील लिफ्ट बंद होत्या. वारंवार वीज खंडित होत असल्याने लिफ्टमध्ये मुले, महिला अडकून पडल्याचे प्रकार घडत आहेत. व्यापारी, दुकानदारांनाही खंडित विजेचा फटका बसतो आहे. तळोजात भविष्यात सिडकोकडून या ठिकाणी पुरवण्यात येणाºया सोयी-सुविधांच्या आमिषाला बळी पडून याठिकाणी घर घेतले. मात्र, आमची घोर निराशा झाल्याचे या ठिकाणी घर खरेदी करणारे रवि शिंदे यांनी सांगितले. अशीच परिस्थिती राहिली, तर स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने स्थलांतरित होण्याची भीती त्यांनी वर्तवली. आता पनवेल महापालिकेत तळोजा नोडचा समावेश करण्यात आल्याने आतातरी येथील समस्यांचे निराकरण होईल का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.