शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी विवेकानंदांची विज्ञान निष्ठा दिशादर्शक

By admin | Updated: January 13, 2017 06:05 IST

स्वामी विवेकानंद यांचे व्यक्तिमत्व आणि विशेषत: त्यांची विज्ञान निष्ठा ही आयुष्यास खऱ्या अर्थाने दिशा

अलिबाग : स्वामी विवेकानंद यांचे व्यक्तिमत्व आणि विशेषत: त्यांची विज्ञान निष्ठा ही आयुष्यास खऱ्या अर्थाने दिशा देणारी अशीच आहे. माझ्या आयुष्यात महर्षी न्यायरत्न विनोद आणि बाळासाहेब ठाकरे हे दोन आदर्श असून, त्यांनीच माझे आयुष्य घडविले, असे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी येथे केले आहे.स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अलिबाग तालुक्यातील केतकीचा मळा येथील महर्षी विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळ आणि गणराज युवक मंडळ अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील अ‍ॅड. दत्ता पाटील कॉलेज आॅफ लॉच्या सभागृहात आयोजित सतराव्या महर्षी न्यायरत्न विनोद वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी रावते बोलत होते. रावते म्हणाले की, परिवहन खात्यामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कॉलेज कॅम्पसमध्ये तरुणांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवून देण्याच्या योजनेचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभानंतर सुरू झालेल्या स्पर्धेत विज्ञान आणि स्वामी विवेकानंद, स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:, बदलत्या अर्थव्यवस्थेचे सामाजिक परिणाम, भाषा मरता, देशही मरतो, पर्यावरण संरक्षण हीच खरी नैतिकता, या विषयांवर स्पर्धकांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून माणगाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माधव कुंटे व पनवेल येथील अ‍ॅड. प्रथमेश सोमण यांनी काम पाहिले. या वेळी अ‍ॅड. श्रीराम ठोसर व अ‍ॅड. अदिती वैद्य आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)