भाजपाच्या ५ सदस्यांचे निलंबन; पक्षाविरोधी कार्यवाही केल्याने निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 19:57 IST2020-12-04T19:57:13+5:302020-12-04T19:57:19+5:30

चिंध्रण ग्रामपंचायती मधील पाच ग्रामपंचायत सदस्यांचे भारतीय जनता पक्षातून निलंबन करण्यात आल्याची माहिती पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुण भगत यांनी दिली आहे.

Suspension of 5 BJP members; Decision by taking action against the party | भाजपाच्या ५ सदस्यांचे निलंबन; पक्षाविरोधी कार्यवाही केल्याने निर्णय

भाजपाच्या ५ सदस्यांचे निलंबन; पक्षाविरोधी कार्यवाही केल्याने निर्णय

पनवेल: पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे चिंध्रण ग्रामपंचायती मधील पाच ग्रामपंचायत सदस्यांचे भारतीय जनता पक्षातून निलंबन करण्यात आल्याची माहिती पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुण भगत यांनी दिली आहे.

ग्रामपंचायतीतील भाजपच्या सरपंच कमलाबाई एकनाथ देशेकर यांच्याविरोधात भाजपाचे ग्रामपंचायत सदस्य नरेश पोशा सोनवणे, तुषार दशरथ दुर्गे, गणपत महादेव कडू, इंदिरा एकनाथ पाटील, चंद्रा कृष्णा कडू यांनी शेकाप सोबत संगनमत करून अविश्वास ठराव मांडला.चिंध्रण ग्रामपंचायत मध्ये भाजपाच्या माध्यमातून विकासाला चालना मिळाली. असे असतानाही शेकापच्या भूलथापांना भुलून या पाच सदस्यांनी अविश्वास संमत केला.भाजपाच्या सदस्यांनी केलेल्या या वर्तनामुळे पक्षाची हानी होत असल्याने त्यांच्यावर उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या शिफारसीनुसार पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

Web Title: Suspension of 5 BJP members; Decision by taking action against the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.