शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
2
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल-सायन महामार्गावरील सबवे पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:01 IST

पनवेल-सायन महामार्गावर कामोठे वसाहतीलगत बांधण्यात आलेले सबवे पाण्यात गेले आहेत. त्यामुळे कळंबोली, कामोठेकरांना जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागत आहे.

कळंबोली : पनवेल-सायन महामार्गावर कामोठे वसाहतीलगत बांधण्यात आलेले सबवे पाण्यात गेले आहेत. त्यामुळे कळंबोली, कामोठेकरांना जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागत आहे. कोपरा आणि कामोठे येथे टोलवसुली सुरू होऊन दोन वर्षे झाली तरी हे सबवे अद्याप सुरू झालेले नाहीत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे.पनवेल-सायन महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. बी.ओ.टी. तत्त्वावर सायन- पनवेल टोलवेज कंपनीला हे काम देण्यात आले होते. त्यानुसार २३ कि.मी. लांबीचे काँक्रीटीकरण करण्यात आले. परंतु बहुतांशी काम बाकी असताना शासनाने कंपनीला टोल वसुली करण्यास परवानगी दिली. कळंबोली, कामोठे, पुरुषार्थ पेट्रोलपंप येथे बांधण्यात आलेले तीन सबवे अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे महामार्ग ओलांडताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. टोल सुरू झाल्यानंतर एक वर्षानंतर भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले. आता हे मार्ग बांधून पूर्ण झाले असले तरी आत पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांकरिता हे भुयारी मार्ग खुले करण्यात आलेले नाही. वसाहतीतील नागरिकांना महामार्ग ओलांडावा लागत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे, तरी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली नाही. तर दुसरीकडे सायन-पनवेल टोलवेज कंपनी नुकसानभरपाई दिली नाही म्हणून शासनाच्या नावाने खडे फोडीत आहे. तीनही ठिकाणी बांधण्यात आलेले स्वच्छतागृह मध्यंतरी बंद होते. महामार्गालगत सर्व्हिस रोड तयार झालेला नाही. कामोठे वसाहतीतून आजही मुंबईकडे जाता येत नाही. त्यासाठी दोन कि.मी.चा वळसा घालावा लागतो. त्यात सबवे केवळ शोभेसाठीच आहेत. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याचे पनवेल-सायन महामार्ग प्रवासी कृती समितीचे अमोल शितोळे यांनी सांगितले. याबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. पी. श्रावगे यांच्याशी संपर्क साधला प्रतिक्रि या मिळाली नाही.