शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
6
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
7
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
8
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
9
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
10
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
11
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
12
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
13
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
14
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
15
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
16
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
17
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
18
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
19
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
20
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळाच्या तिसऱ्या रनवेचा अभ्यास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 09:20 IST

Navi Mumbai News: मुंबई महानगर प्रदेशाच्या झपाट्याने होणाऱ्या विकासाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसरी धावपट्टी उभारण्याच्या शक्यतेचा सखोल अभ्यास करण्यासाठी सिडकोने ‘राइट्स लिमिटेड’ आणि ‘क्रिएटिव्ह ग्रुप एलएलपी’ या संयुक्त सल्लागार संस्थेची नियुक्ती केली आहे.

नवी मुंबई - मुंबई महानगर प्रदेशाच्या झपाट्याने होणाऱ्या विकासाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसरी धावपट्टी उभारण्याच्या शक्यतेचा सखोल अभ्यास करण्यासाठी सिडकोने ‘राइट्स लिमिटेड’ आणि ‘क्रिएटिव्ह ग्रुप एलएलपी’ या संयुक्त सल्लागार संस्थेची नियुक्ती केली आहे. हा अभ्यास सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे.

१५ एप्रिल २०२६ रोजी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अभ्यासाची रूपरेषा आणि अपेक्षित निष्कर्षांवर चर्चा झाली. भविष्यातील विस्तारासाठी आवश्यक नियोजनालाही यावेळी अंतिम स्वरूप देण्याची दिशा निश्चित करण्यात आली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज  विमानतळासोबत दुहेरी विमानतळ प्रणालीचा महत्त्वाचा भाग आहे. वाढत्या प्रवासी आणि मालवाहतुकीचा ताण लक्षात घेता ही प्रणाली आगामी काळात निर्णायक ठरणार आहे. सुमारे १,१६० हेक्टर क्षेत्रावर उभारल्या जाणाऱ्या या विमानतळाची पूर्ण क्षमता विकसित झाल्यानंतर दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी आणि ३.२ दशलक्ष टन माल हाताळण्याची क्षमता असेल. 

सिडकोची चाचपणीमुंबई महानगर प्रदेशातील हवाई प्रवासी संख्या २०४० पर्यंत १५० दशलक्ष, तर २०४७-५० दरम्यान २४० दशलक्षपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. वाढवण येथे प्रस्तावित तिसऱ्या विमानतळाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई विमानतळाच्या विस्तारातूनच ही वाढ हाताळण्याचा पर्यायही सिडको तपासत आहे. 

कोणत्या गोष्टींचा अभ्यास होणार?सल्लागार संस्था तांत्रिक, पर्यावरणीय, आर्थिक आणि कार्यकारी पैलूंवर सखोल अभ्यास करणार असून, जमीन उपलब्धता, खर्च, हवाई वाहतूक व्यवस्थापन आणि अंमलबजावणीची व्यवहार्यता यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. या अहवालावरून विस्ताराबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जागतिक दर्जाचे विमानतळ म्हणून विकसित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. भविष्यातील वाढत्या हवाई वाहतुकीचा विचार करून आतापासून नियोजन करणे आवश्यक आहे. तिसरी धावपट्टी ही विमानतळाची क्षमता, कार्यक्षमता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी महत्त्वाची ठरेल.विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbai Airport: Study Begins for Third Runway Feasibility

Web Summary : CIDCO initiates study for a third runway at Navi Mumbai International Airport due to rising air traffic. The study will assess technical, environmental, and economic aspects, aiming to enhance airport capacity and global competitiveness.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ