शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी गणवेशापासून वंचित; महापालिकेच्या उदासीनतेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:28 IST

शैक्षणिक वर्षाचे प्रथम सत्र संपले, तरी नवी मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेकडून शालेय गणवेश मिळालेले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी वापराचे कपडे घालून शाळेत जावे लागत आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : शैक्षणिक वर्षाचे प्रथम सत्र संपले, तरी नवी मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेकडून शालेय गणवेश मिळालेले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी वापराचे कपडे घालून शाळेत जावे लागत आहे. पालिका प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून, विद्यार्थ्यांची सुरक्षितताही धोक्यात आली आहे.नवी मुंबई शहरातील गाव-गावठाण, झोपडपट्टी आणि कॉलनीमध्ये राहणाºया गरीब विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी महापालिकेच्या वतीने अत्याधुनिक शाळांच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. पालिका शाळेत शिकणाºया प्राथमिकमधील विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पाठ्यपुस्तके, बूट, मौजे आणि माध्यमिक विभागात शिकणाºया विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दप्तर, वह्या, पाठ्यपुस्तके, बूट, रेनकोट, मौजे, पीटी गणवेश, स्काउट गाइड गणवेश, पीटीचे बूट यासारखे शालेय साहित्य पुरविण्यात येते. त्याचप्रमाणे पूरक पोषणआहार, मध्यान्ह भोजन यासारख्या सुविधाही पुरविण्यात येतात. पालिका शाळेतील सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा यामुळे राज्यातील इतर महापालिका शाळांपेक्षा नवी मुंबई पालिका शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांचा पटदेखील दरवर्षी वाढत आहे. पालिकेमार्फत देण्यात येणाºया गणवेश आणि शालेय साहित्यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत, शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साली राज्य सरकारने शालेय साहित्य, गणवेश पालकांनी विकत घ्यावेत आणि त्याची बिले सादर केल्यावर त्यांच्या बँक खात्यावर पालिकेमार्फत पैसे टाकावेत, असे डीबीटी धोरण संपूर्ण राज्यात आणले. शासनाने आणलेल्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने २०१६-१७ साली गणवेश बनविण्याचा ठेका पालिकेने रद्द केला. शासनाने आणलेल्या धोरणांची पालकांना कल्पना नसल्याने, तसेच आर्थिक परिस्थितीमुळे नव्याने प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना आणि प्राथमिकमधून माध्यमिक विभागात गेलेल्या विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहावे लागेल. २०१७-१८ साली प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना बाजारात पालिका शाळेचे गणवेश उपलब्ध झाले नाहीत.माध्यमिक शाळांचे गणवेश काहीच ठिकाणी मिळाल्याने अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले. २०१८-१९ या चालू शैक्षणिक वर्षात राज्य सरकारने शालेय गणवेश पालिकेनेच पुरावावेत, असा नियम केला आहे. महापालिकेच्या उदासीन धोरणामुळे शैक्षणिक वर्षाचे प्रथम सत्र संपले, तरी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश उपलब्ध झालेले नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून पालिकेच्या माध्यमातून गणवेश मिळाले नसल्याने शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांना तसेच या पालिका शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना घरी वापरातील रंगबिरंगी कपडे घालून शाळेत यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे.पैसे न मिळाल्याने साहित्य खरेदीकडे पाठपालिकेमार्फत विद्यर्थ्यांना शैक्षणिक साहित्य न देता, डीबीटी धोरणाची अंमलबजावणी करण्याचे शासनाचे धोरण आहे; परंतु गेल्या वर्षी शालेय साहित्य खरेदी करून शाळेत बिले जमा केल्यावरही अनेक पालकांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य खरेदी केले नसून, एकही बिल महापालिकेकडे जमा झाले नाही. त्यामुळे शासनाच्या या धोरणाकडे पालकांनी पाठ फिरविल्याचे समोर आले आहे.शासन नियमानुसार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश महापालिकेच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव महासभेत मंजूर झाला असून विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप लवकरच करण्यात येईल.- संदीप संगवे,शिक्षणाधिकारी,नवी मुंबई महापालिका

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाEducationशिक्षणNavi Mumbaiनवी मुंबई