शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

लॉकडाऊनला सामोरे जायचे नसल्यास काटेकोर नियम पाळणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 12:29 AM

आयुक्तांचा एपीएमसीला कडक इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी अचानक भेट दिली. भाजीपाला व फळ मार्केटमधील स्थिती पाहून आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जायचे नसल्यास कोरोनाविषयी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश त्यांनी व्यापारी व प्रशासनास दिले आहेत. नवी मुंबईमध्ये कोरोनाविषयी नियमांचे सर्वाधिक उल्लंघन बाजार समितीमधील पाचही मार्केटमध्ये होत आहे. मार्केटमुळे शहरातील प्रादुर्भाव वाढत आहे. याविषयी अनेक तक्रारी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडेही गेल्या आहेत. महानगरपालिकेने यापूर्वीही प्रशासनास सूचना दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिले आहेत. या सूचनांचे पालन केले जाते का? हे पाहण्यासाठी आयुक्तांनी अचानक भाजीपाला व फळ मार्केटला भेट दिली. आयुक्तांनी अचानक हजेरी लावल्यामुळे व्यापारी, कामगार, वाहतूकदार, खरेदीदार या सर्वांची धावपळ उडाली. मार्केटमध्ये बहुतांश नागरिकांकडे मास्क असल्याचे निदर्शनास आले. परंतु मास्क हनुवटीवर ठेवून व्यवहार सुरू असल्याचे निदर्शनास आले. सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन केले जात नसल्याचेही निदर्शनास आले. आयुक्तांनी संचालक व प्रशासनाशी चर्चा केली. शहरातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी बाजार समितीमध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. मार्केटमध्ये नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. परंतु कारवाईचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले. यापुढे नियमित कारवाई करण्याचे निर्देश दिले.बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये प्रतिदिन ६० हजार ते १ लाख नागरिक भेट देतात. देशभरातून वाहतूकदार येत असतात. या ठिकाणी कोरोनाविषयी नियमांचे काटेकोरपणे पालन झाले नाही, तर नवी मुंबईसह इतर शहरांमध्ये कोरोना पसरण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यात लॉकडाऊनला सामाेरे जायचे नसल्यास नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. प्लॅस्टिक वापराविषयी नाराजीमहानगरपालिका आयुक्तांनी भाजीपाला व फळ मार्केटला अचानक भेट दिली असता मार्केटमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.

बाजार समितीमध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणारांवर कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही. प्रशासनास योग्य सूचना करण्यात आल्या असून, पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा अचानक भेट देऊन पाहणी केली जाईल. - अभिजित बांगर,  आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका