शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळबाधितांच्या सार्वजनिक मंदिरांच्या बांधकामास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:21 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व अनुषंगिक कामासाठी स्थलांतरित होणाऱ्या बांधकामाबद्दल प्रकल्पबाधितांना २२.५ टक्के व पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पॅकेजसोबत प्रकल्पबाधितांच्या गावांमधील सर्व मंदिरांसाठी सिडकोतर्फे भूखंड देण्यात आले आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व अनुषंगिक कामासाठी स्थलांतरित होणाऱ्या बांधकामाबद्दल प्रकल्पबाधितांना २२.५ टक्के व पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पॅकेजसोबत प्रकल्पबाधितांच्या गावांमधील सर्व मंदिरांसाठी सिडकोतर्फे भूखंड देण्यात आले आहेत. त्यातील वरचे ओवळे व कोल्ही गावांच्या मंदिरासाठी बांधकाम परवाने देण्यात आले असून या गावातील ग्रामस्थांनी मंदिराचे बांधकाम सुरू केले आहे.विमानतळ प्रकल्पबाधित दहा गावांच्या मागण्यांनुसार त्यांच्या गावांमधील सर्व मंदिरासाठी एक भूखंड देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार दहा गावांपैकी ओवळे, कोल्ही, तरघर, चिंचपाडा, गणेशपुरी, उलवे व कोपर या गावांमधील मंदिरासाठी भाडेपट्टा करारनामा करण्यात आला आहे. सिडकोतर्फे गावातील मुख्य मंदिराच्या बांधकामासाठी एक कोटी देण्यात येणार असून भाडेपट्टा करार केल्यानंतर बांधकाम सुरू करण्यासाठी या निधीतील ५० लाख रुपये रक्कम आगाऊ देण्यात येणार आहेत. त्यानुसार वरचे ओवळे, तरघर, कोल्ही व कोपर गावांना ५० लाख रुपये देण्यात आले आहेत. तर गणेशपुरी व उलवे गावातील मंदिरासाठी येत्या काही दिवसात ५० लाख देण्यात येतील. त्याचबरोबर प्रत्येक गावातील मुख्य मंदिरासाठी इतर मंदिराच्या बांधकामासाठी त्या मंदिरांचे मूल्यांकन करून त्यानुसार निधी देण्यात येणार आहे.वरचे ओवळे व कोल्ही गावांतील मंदिर उभारणीसाठी बांधकाम परवाने मिळाले असून त्यांनी मंदिराच्या बांधकामास सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे उर्वरित गावांनी सुद्धा लवकरात लवकर मंदिरासाठीच्या बांधकाम परवान्यांची प्रक्रिया पूर्ण करून बांधकामास सुरुवात करावी, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबई