शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

मेट्रोच्या कामाला पुन्हा गती; नवीन चार कंत्राटदारांची नेमणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 12:34 AM

कंत्राटदारांनी निर्माण केलेल्या न्यायालयीन वादामुळे मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात आला आहे.

- कमलाकर कांबळे नवी मुंबई : कंत्राटदारांनी निर्माण केलेल्या न्यायालयीन वादामुळे मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात आला आहे. हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सिडकोने आता नवीन कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. त्यानुसार संबंधित कंत्राटदारांनी मागील आठवड्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आॅक्टोबर २0१९ पर्यंत मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होईल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी व्यक्त केला आहे.सिडकोने २०११ मध्ये नवी मुंबई मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तीन टप्प्यांत हा मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्यासाठी चार हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यापैकी बेलापूर-खारघर-तळोजा-पेंधर या ११ कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम मागील पाच वर्षांपासून सुरू आहे. मात्र, विविध कारणांमुळे या कामाची गती मंदावली आहे. पहिल्या टप्प्याचे काम रखडल्याने उर्वरित दोन टप्पेसुद्धा रखडले आहेत, त्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. पहिल्या टप्प्यात बेलापूर ते पेंधर दरम्यानच्या ११ किमी अंतरावरील उन्नत मार्ग, पेंधर येथील कारशेड उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु कंत्राटदारांच्या वादामुळे स्थानकांचे काम मागील सहा वर्षांपासून रखडले आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे. यापार्श्वभूमीवर रखडलेल्या मेट्रोच्या कामालाही गती देण्यात येत आहे. त्यानुसार सॅजोन्स, सुप्रीम आणि महावीर या तीन भागीदार कंपन्यांची हकालपट्टी करून रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी नवीन कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. या कंत्राटदारांनी कामाला सुरुवातही केली आहे. नवी मुंबई विमानतळावरून डिसेंबर २0१९ मध्ये विमानाचे पहिले टेकआॅफ होण्याची शक्यता आहे. परंतु उड्डाणापूर्वीच मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा निर्धार सिडकोने केला आहे.मेट्रो प्रकल्पाच्या तीन टप्प्यांचा तपशीलबेलापूर ते पेंधर या पहिल्या टप्प्याच्या ११ कि.मी. लांबीच्या मार्गासाठी सुरुवातीच्या काळात दोन हजार कोटी रुपये खर्च अंदाजित करण्यात आला होता. दुसरा टप्पा ८.३५ कि.मी. लांबीचा आहे. तळोजा एमआयडीसी-कळंबोली-खांदेश्वर मार्गे आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा मार्ग जोडला जाणार आहे. त्यासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. पहिल्या दोन टप्प्यांना जोडण्यासाठी तिसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. हा टप्पा केवळ दोन कि.मी. लांबीचा असून, त्यासाठी ५७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे; परंतु पहिलाच टप्पा पाच वर्षे रखडल्याने उर्वरित दोन टप्प्यांचे कामही लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या एकूण खर्चात दुपटीने वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.उर्वरित दोन टप्प्यांसाठी चाचपणीआंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मेट्रो प्रकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण तीन टप्प्याच्या माध्यमातून मेट्रो थेट विमानतळाला जोडली जाणार आहे. मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी आता आॅक्टोबर २०१९ ची डेडलाइन देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा विमानतळाला काहीच उपयोग होणार नाही. उर्वरित दोन टप्प्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय मेट्रोची व्यवहार्यता सिद्ध होणार नाही. ही बाब ओळखून पहिल्या टप्प्याबरोबरच उर्वरित दोन टप्प्याच्या कामालाही गती देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. हे काम तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे असले तरी ते गरजेचे आहे. त्या दृष्टीने चाचपणी सुरू केल्याची माहिती लोकेश चंद्र यांनी ‘लोकमत’ला दिली.नव्या चार कंत्राटदारांवर जबाबदारीबेलापूर ते पेंधर या ११ किमी लांबीच्या मार्गावर एकूण ११ स्थानके आहेत. या सर्व स्थानकांची कामे रखडली आहे. ती पूर्ण करण्यासाठी स्थानक १ ते ६ क्रमांकाच्या स्थानकांसाठी प्रकाश कन्सोरियम कंपनीला १२७ कोटी रुपयांचा ठेका दिला आहे. तर स्थानक क्रमांक ७ ते ८ पूर्ण करण्यासाठी २८ कोटींचा ठेका बिल्ड राईड कंपनीला दिला आहे.८ आणि ११ क्रमांकाच्या स्थानकाच्या कामासाठी युनिवास्तू कंपनीला ४३ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. तर १0 क्रमांकाचे स्थानक पूर्ण करण्यासाठी जे. कुमार कंपनीला ५३ कोटी रुपयांचे काम देण्यात आले आहे. या चार कंत्राटदार कंपन्यांना काम पूर्ण करण्याची कालमर्यादा आहे.

टॅग्स :Metroमेट्रोNavi Mumbaiनवी मुंबई