कर्जतमध्ये जमिनीतून धूर

By Admin | Updated: July 7, 2017 04:22 IST2017-07-07T04:22:11+5:302017-07-07T04:22:11+5:30

कर्जत शहरातील राज नोव्हा सिनेमागृहासमोरील रस्त्यालगतच्या एका दगडाखालील खड्ड्यातून अचानक गरम वाफा तसेच धूर

Smoke from land in Karjat | कर्जतमध्ये जमिनीतून धूर

कर्जतमध्ये जमिनीतून धूर

लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ /कर्जत : कर्जत शहरातील राज नोव्हा सिनेमागृहासमोरील रस्त्यालगतच्या एका दगडाखालील खड्ड्यातून अचानक गरम वाफा तसेच धूर निघाल्याने खळबळ उडाली.
प्रत्यक्षदर्शी जगदीश दगडे या तरुणाने याची माहिती कर्जत आपत्ती विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच कर्जत नगर परिषदेच्या, तहसील कार्यालयाच्या आपत्कालीन विभाग कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. येथील खड्डा खोदून यातील दगड आणि माती काढली. यांची पाहणी केली असता, ते अतिशय गरम झालेले होते. सुमारे दोन फूट खोदल्यानंतर हा धूर बंद झाला; परंतु हा धूर आणि गरम वाफ नक्की कशामुळे येत होती, याचा शोध लागलेला नाही.

Web Title: Smoke from land in Karjat