एकनाथ शिंदेंना घेरण्याचे संकेत, भाजपा मंत्र्यांचा इशारा; दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 09:27 IST2026-02-13T09:25:16+5:302026-02-13T09:27:39+5:30

पालिकेची लूट झाल्याचा आरोप, प्रशासकीय काळातील व्यवहारात दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हे

Signs of encircling Eknath Shinde, BJP ministers warn; Criminal cases will be filed if found guilty | एकनाथ शिंदेंना घेरण्याचे संकेत, भाजपा मंत्र्यांचा इशारा; दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करू

एकनाथ शिंदेंना घेरण्याचे संकेत, भाजपा मंत्र्यांचा इशारा; दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करू

नवी मुंबई - महापालिकेत प्रशासकीय कालावधीत कोट्यवधी रुपयांची लूट झाली आहे. ती कोणी केली, कशी केली, कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली, याची चौकशी केली जाईल. हा चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास सांगितले जाईल, असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी दिला. वाशीतील जनता दरबाराप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. 

नवी मुंबई महापालिकेच्या २० फेब्रुवारीला होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी प्रशासकीय काळात केलेल्या कामांची चौकशी करण्याचे प्रस्ताव मांडले आहेत. नगररचना विभाग, आरोग्य विभागासह सर्व विभागांमध्ये प्रशासकीय काळात केलेल्या कामांची चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती नेमावी, चौकशी करून प्रशासकीय काळातील कामाविषयी श्वेतपत्रिका काढावी, असा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर वाशीतील जनता दरबारदरम्यान गणेश नाईक यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 

एकनाथ शिंदेंना घेरण्याचे संकेत?
महापालिकेत कोट्यवधी रुपयांची लूट झाली आहे. ती नक्की कोणी केली व कोणाच्या सांगण्यावरून केली, याची चौकशी झाली पाहिजे.  अहवाल आल्यानंतर लूट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले जातील, असे ते म्हणाले. या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांना घेरण्याचे संकेत दिल्याची चर्चा  आहे.

Web Title : एकनाथ शिंदे पर निशाना? भाजपा मंत्री ने मामले दर्ज करने का संकेत दिया।

Web Summary : मंत्री गणेश नाइक ने नवी मुंबई नगर निगम के प्रशासनिक काल में कथित भ्रष्टाचार की जांच के बाद आपराधिक आरोप दायर करने की चेतावनी दी। भाजपा पार्षदों द्वारा प्रस्तावित जांच का उद्देश्य विभागों में संभावित अनियमितताओं को लक्षित करना है, जो एकनाथ शिंदे की संलिप्तता का संकेत देता है।

Web Title : Eknath Shinde to be targeted? BJP Minister hints at filing cases.

Web Summary : Minister Ganesh Naik warned of filing criminal charges after investigating alleged corruption in Navi Mumbai Municipal Corporation's administrative period. Inquiry proposed by BJP corporators targets potential irregularities across departments, hinting at Eknath Shinde's involvement.