शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी उद्यानाच्या प्लॅनवरून वादाची चिन्हे; वन्यजीव संरक्षणावरून पर्यावरणतज्ज्ञांचा संताप

By नारायण जाधव | Updated: March 26, 2026 12:08 IST

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रासाठी (इको-सेन्सिटिव्ह झोन) मंजूर झालेल्या झोनल मास्टर प्लॅनवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रासाठी (इको-सेन्सिटिव्ह झोन) मंजूर झालेल्या झोनल मास्टर प्लॅनवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. २० मार्च २०२६ च्या शासन निर्णयानंतर ‘नियंत्रित विकास’च्या नावाखाली प्रत्यक्षात शहरी विस्ताराला मोकळीक दिली जात आहे का, असा सवाल पर्यावरण तज्ज्ञ आणि कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

या प्लॅनमुळे जंगलालगतच्या भागात मानवी हस्तक्षेप वाढण्याची शक्यता असून वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर थेट आघात होणार आहे. विशेषतः बिबट्यांसारख्या प्राण्यांचा अधिवास कमी झाल्यास मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो. जलस्रोत आणि कॅचमेंट एरियामध्ये बांधकामांना परवानगी दिल्यास पूरस्थिती, भूजल पातळी आणि पाण्याच्या उपलब्धतेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

बांधकामांना चालना देणारा आराखडा

स्थानिक रहिवासी, आदिवासी आणि झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाबाबत स्पष्ट धोरण नसल्याने सामाजिक असंतोष वाढू शकतो. संजय गांधी उद्यानाच्या संरक्षणासाठी झोनल प्लान असावा अशी पर्यावरणप्रेमींची मागणी होती.  मात्र, मंजूर आराखडा बांधकामांना चालना देणारा असल्याची टीका पर्यावरणप्रेमींनी केली होती. त्यानंतर त्याची अंतिम मंजुरी थांबविली होती. त्यानंतर आता १० वर्षांनी त्यास अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.

आराखड्यात काय?

या आराखड्यात  रिअल इस्टेट आणि पायाभूत प्रकल्पांना संधी देण्याचा प्रयत्न असल्याची टीका होत आहे. इको सेन्सिटिव्ह झोनमधील अवघे ३४ टक्केच वनक्षेत्र उरले असून तब्बल ६६ टक्के भाग आधीच नॉन-फॉरेस्ट असल्याने बांधकामांना अप्रत्यक्ष ग्रीन सिग्नल मिळू शकतो.

‘रेड कॅटेगिरी’ उद्योगांवर बंदीचा दावा केला जात असला, तरी इतर प्रकल्पांना सशर्त परवानगी दिल्याने पर्यावरणावर ताण वाढू शकतो. इको-टुरिझमच्या नावाखाली व्यावसायिक उपक्रमांना चालना मिळण्याचेही संकेत आहेत.

महामुंबईतील सुविधांवर ताण येण्याची भीती

महामुंबईतील ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पालघर आणि मुंबई उपनगर या शहरांमध्ये वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन आणि वायूप्रदूषणाचे प्रश्न आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्र सरकारने थातूरमातूर बदल करून या झोनल प्लॅनला अंतिम मंजुरी दिली आहे. मुळात हा प्लॅन बिल्डरधार्जिणा आहे. आधीच उद्यानाच्या अधिकाधिक क्षेत्रात अतिक्रमण झाले आहे. बांधकामे झाली आहेत. शासनाला उद्यानात बिल्डरांना देण्यासाठी जागा आहेत, पण वन्यजीवांसाठी नाही. - दयानंद स्टॅलीन, संचालक वनशक्ती.

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjay Gandhi Park Plan Sparks Controversy; Wildlife Protection Concerns Raised

Web Summary : Sanjay Gandhi National Park's zonal plan faces criticism for potentially prioritizing urban expansion over wildlife. Experts fear increased human interference, habitat loss for leopards, and water scarcity. The plan, favoring construction, may strain Mumbai's infrastructure and disregard tribal rights, prompting environmental concerns.
टॅग्स :Mumbaiमुंबई