खंडणीसाठी दूध डेअरी मालकावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 11:25 PM2020-09-28T23:25:30+5:302020-09-28T23:28:59+5:30

उलवे नोड येथील घटना : कथित पत्रकाराला न्हावा-शेवा बंदर पोलिसांनी केली अटक

Shooting at a milk dairy owner for ransom | खंडणीसाठी दूध डेअरी मालकावर गोळीबार

खंडणीसाठी दूध डेअरी मालकावर गोळीबार

Next

उरण : बातमी प्रसारित करून व्यवसाय बंद करण्याची धमकी देऊनही खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या एका लोकल न्यूज चॅनेलच्या कथित पत्रकाराने उलवे येथील दूध डेअरीच्या मालकावर पिस्तूलमधून गोळ्या झाडून ठार मारण्याची धमकी दिली. उलवे नोडमध्ये हा प्रकार घडला. न्हावा-शेवा बंदर पोलिसांनी आशिष चौधरीला(५२) पिस्तुलासह अटक केली आहे. उलवे येथे उजाला दूध डेअरी आहे. त्याच्या मालकाकडून या आधीही धमकावून आशिष पैसे वसूल करीत होता. रविवारीही (२७) आशिषने मालकाला धमकावण्यास सुरुवात केली होती.

लॉकडाऊनमध्ये नियमांचे पालन न करता, दूध डेअरीचा व्यवसाय करीत असल्याची उलवे न्यूज युट्युब चॅनलवर बातमी प्रसारित करून व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देऊन त्याने दोन हजार रुपये खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाहीत, तर ठार मारण्याची धमकीही दिली होती. मात्र, मालकाने मागणी धुडकावून लावली. त्यामुळे संतप्त झालेल्या आशिषने जवळच असलेल्या पिस्तूलमधून शैलेंद्र कुमार रामशरण यादव (३२) यांच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने नेम चुकल्याने शैलेंद्र बचावले. या प्रकरणी शैलेंद्र यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवून आरोपीला पकडल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर पोलीसांनी दिली.

आशिष उलवे येथील रहिवासी आहे. तो उलवे न्यूज चॅनलच्या नावाने युट्युबवर बातम्या प्रसारित करीत असतो.

Web Title: Shooting at a milk dairy owner for ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.