शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्याबाबत लोकप्रतिनिधी उदासीन

By admin | Updated: September 15, 2015 23:27 IST

महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या विशेष सभेविषयी नगरसेवकच उदासीन असल्याचे निदर्शनास आले. ११६ नगरसेवकांपैकी फक्त ८७ जणांनीच

- नामदेव मोरे,  नवी मुंबईमहापालिकेच्या आरोग्य यंत्रणेविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या विशेष सभेविषयी नगरसेवकच उदासीन असल्याचे निदर्शनास आले. ११६ नगरसेवकांपैकी फक्त ८७ जणांनीच सभागृहात हजेरी लावली. ३६ जणांनी चर्चेत सहभाग घेतला. तर सभेच्या अखेरीस फक्त २० सदस्य उपस्थित असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील १२ लाख नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यू, मलेरियाचे थैमान सुरू आहे. शहरवासी भयभीत झाले आहेत. जागृत नगरसेवकांनी याविषयी विशेष सभेमध्ये प्रशासनास धारेवर धरले असताना बहुतांश सदस्यांनी मात्र आरोग्याच्या विषयाकडेही दुर्लक्ष केले. ११ वाजता सभेचे आयोजन केले होते. परंतु प्रत्यक्षात एक तास उशिरा कामकाज सुरू झाले. सभागृहात निवडून आलेले १११ व ५ स्वीकृत असे ११६ नगरसेवक आहेत. त्यामधील फक्त ८७ जणच हजर होते. २९ नगरसेवक सभागृहाकडे फिरकलेच नाहीत. प्रत्येक तासानंतर सदस्यांची संख्या कमी होवू लागली. अनेकांनी स्वत:चे भाषण झाले की घरी जाणे पसंत केले. रात्री सभा संपली तेव्हा २० जणच हजर होते. दिवसभरात फक्त ३६ जणांनीच चर्चेत सहभाग घेतला. उर्वरित ८० जणांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. आरोग्याच्या सभेमध्ये अनेक नवीन नगरसेवकांनी त्यांची मते व्यक्त केली. संगीता अशोक पाटील, सायली शिंदे, ऋचा पाटील या पहिल्यांदा सभागृहात आलेल्या नगरसेविकांनीही चांगल्या सूचना केल्या. शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले असताना सर्व नगरसेवक अभ्यासपूर्वक मते व्यक्त करतील. अनागोंदी कारभार करणाऱ्यांवर कारवाई होईल अशी अपेक्षा होती. परंतु नगरसेवकच उदासीन असल्यामुळे या सभेतून काहीच निष्पन्न झाले नाही.सहभाग घेतलेले नगरसेवक मनीषा भोईर, उषा भोईर, सरोज पाटील, घनश्याम मढवी, एम. के. मढवी, संजू वाडे, ऋचा पाटील, राजू शिंदे, भारती पाटील, हेमांगी सोनावणे, सायली शिंदे, निवृत्ती जगताप, मोनिका पाटील, रंगनाथ औटी, गणेश म्हात्रे, सूरज पाटील, रामचंद्र घरत, उज्ज्वला झंझाड, किशोर पाटकर, संगीता वास्के, राधा कुलकर्णी, संगीता पाटील, गिरीष म्हात्रे, दीपक पवार, नेत्रा शिर्के, विजय चौगुले, जे. डी. सुतार, अविनाश लाड, रवींद्र इथापे, दिव्या गायकवाड, नवीन गवते, रामदास पवळे, पूनम पाटील, चेतन नाईक, करण मढवी, मेघाली राऊत.