अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 11:41 IST2020-10-20T11:40:09+5:302020-10-20T11:41:16+5:30
पीडित मुलगी ही १३ ते १६ ऑक्टोबर रोजी किराणा दुकानात गेली होती. यावेळी घरी परत येत असताना विधी संघर्षग्रस्त मुलाने तिला रस्त्यात गाठले व तिच्या तोंडावर हात ठेवून तिला कच्ची मोहल्ला येथील बिल्डिंगच्या टेरेसवर घेऊन गेला.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गुन्हा दाखल
नवीन पनवेल : पनवेल परिसरात एका ११ वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ही ११ वर्षीय पीडित मुलगी किराणा दुकानातून घरी परत येताना, १४ वर्षीय मुलाने एका चारमजली इमारतीच्या टेरेसवर नेऊन तिला धमकी देऊन बलात्कार
केला आहे.
पीडित मुलगी ही १३ ते १६ ऑक्टोबर रोजी किराणा दुकानात गेली होती. यावेळी घरी परत येत असताना विधी संघर्षग्रस्त मुलाने तिला रस्त्यात गाठले व तिच्या तोंडावर हात ठेवून तिला कच्ची मोहल्ला येथील बिल्डिंगच्या टेरेसवर घेऊन गेला. त्यानंतर, तिला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकाराबाबत पीडित मुलीने आपल्या घरातील व्यक्तीना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाइकांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक आर.एस.जाधव हे करीत आहेत. अशा प्रकारे अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस आणि नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.