शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न धोकादायक वळणार, रहिवाशांत संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 03:51 IST

शुक्रवारी महापालिकेने अतिधोकादायक यादीत समावेश असलेल्या वाशीतील ११ इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित केला. ऐन पावसाळ्यात कोणतीही पूर्वसूचना न देता कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली.

नवी मुंबई -  शुक्रवारी महापालिकेने अतिधोकादायक यादीत समावेश असलेल्या वाशीतील ११ इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित केला. ऐन पावसाळ्यात कोणतीही पूर्वसूचना न देता कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. त्यामुळे सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक वर्षी या प्रश्नावर खल केला जातो. आरोप-प्रत्यारोप केले जातात; परंतु सकारात्मक तोडगा काढण्याची कोणतीच भूमिका मांडली जात नाही, त्यामुळे रहिवाशांत सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात खदखद निर्माण झाली आहे. त्यांच्या संभाव्य उद्रेकामुळे पुनर्बांधणीच्या प्रश्नाला धोकादायक वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सिडकोने बांधलेल्या इमारतीची अल्पावधीतच पडझड सुरू झाली आहे. दिवसाआड लहान-मोठे अपघात घडत आहेत. या इमारतीच्या पुनर्बांधणीचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून चर्चिला जात आहे. विशेष म्हणजे, केवळ राजकीय पटलावर या विषयावर चर्चा होत आहे. निवडणुकीतील प्रचाराचा हा प्रमुख मुद्दा बनला आहे. विधानसभेच्या निवडणुका समीप आल्या आहेत. या निवडणुकीतही हाच प्रश्न प्रचाराच्या केंद्रस्थानी असणार आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी याच मुद्द्यावर अनेक निवडणुका लढविल्या आणि जिंकल्याही; परंतु पुनर्बांधणीचा प्रश्न मात्र जैसे थेच राहिला. पुनर्बांधणीच्या मार्गातील तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत; परंतु शहरात संक्रमण शिबिराचे नियोजन नसल्याने पुनर्बांधणीला खो बसला आहे. मागील १५ वर्षांत संक्रमण शिबिर उभारण्यास महापालिकेला अपयश आले आहे. त्यामुळे पुनर्बांधणीची प्रक्रिया रखडली आहे. न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत महापालिकेने शहरातील अतिधोकादायक इमारतीचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे अशा इमारतीतून राहणाºया रहिवाशांत महापालिका प्रशासनाबरोबरच राजकर्त्यांविषयी खदखद निर्माण झाली आहे. महापालिकेच्या कारवाईला तूर्तास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असली, तरी रहिवाशांत कमालीचा असंतोष पाहावयास मिळत आहे.संक्रमण शिबिराबाबत उदासीनतामहापालिकेने यावर्षी ३७८ धोकादायक इमारती जाहीर केल्या आहेत. यात ५५ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. या इमारती तातडीने रिकाम्या करण्याच्या नोटिसा रहिवाशांना बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, निर्वासित होणाºया या रहिवाशांनी जायचे कुठे, याचे कोणतेही नियोजन महापालिकेने केलेले नाही. आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडणारी संक्रमण शिबिरे उपयुक्त ठरतात; परंतु मागील २५ वर्षांत महापालिकेला त्याचे कधीही स्मरण झाले नाही. महापालिकेच्या या नकारात्मक भूमिकेचा फटका आता रहिवाशांना सहन करावा लागत आहे.शहरातील ५२ हजार रहिवाशांचा जीव टांगणीलाशहरात सिडकोनिर्मित जवळपास आठ हजार इमारती आहेत. यात सुमारे ५२ हजार रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. या इमारती राहण्यास धोकादाक ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांची पुनर्बांधणी करणे आवश्यक ठरले आहे. मात्र, पुनर्बांधणीच्या आड लपलेल्या अर्थकारणामुळे या प्रक्रियेला खीळ बसली आहे. विशेष म्हणजे, प्रश्न मार्गी लावण्याऐवजी राजकीय पक्षात श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू आहे. याचा मनस्ताप येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.शहरातील अनेक इमारती धोकादायक ठरविण्यावरूनही मतभेद आहेत. काही इमारती जाणिवपूर्वक अतिधोकादायकच्या यादीमध्ये टाकल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे. काही ठिकाणी पुनर्बांधणीवरून दोन गट निर्माण झाले आहेत. स्थानिक नगरसेवक, विकासक आणि संबंधित सोसायटीतील काही पदाधिकारी यांच्यातील अर्थपूर्ण समेटामुळे पुनर्बांधणीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होऊ लागला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई