शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
6
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
7
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
8
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
9
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
10
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
11
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
12
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
13
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
14
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
15
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
16
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
17
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
18
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
19
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
20
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

केेंद्राच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 01:01 IST

इंटकची निदर्शने : कामगारविरोधी कायदे रद्द करण्याची मागणी

नवी मुंबई : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविराेधात नवी मुंबई इंटकच्या वतीने निषेध करण्यात आला. महानगरपालिका रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र व एमआयडीसीमध्येही केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली शहरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. 

वाशीतील महानगरपालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात कामगारांनी निदर्शने केली. ‘रद्द करा, रद्द करा, कामगारविरोधी कायदे रद्द करा’ अशा घोषणा केल्या. या वेळी वाशी रुग्णालय वॉर्ड बॉय संघटनेचे अध्यक्ष सुहास म्हात्रे, बहुउद्देशीय सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष कमलेश आठवले, इंटक प्रणीत माथाडी संघटनेचे नेते दिनेश गवळी, कुणाल खैरे, मनीष महापुरे, संग्राम इंगळे उपस्थित होते. या वेळी निदर्शनांचा त्रास रुग्णालयातील रुग्णांना होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. सानपाडा नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनीही निदर्शने केली. केंद्र शासनाच्या नवीन कायद्यामुळे कामगारांचे प्रचंड नुकसान होणार आहे. कामगार देशाेधडीला लागणार आहेत. कामगारविरोधी कायदे रद्द करावेत, अशी भूमिका रवींद्र सावंत यांनी मांडली.

कोकण भवनमधील कर्मचाऱ्यांचा संप नवी मुंबई : कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये कोकण भवनमधील कर्मचारीही सहभागी झाले होते. जुनी पेंशन योजना सुरू करण्यात यावी. कंत्राटीकरण रद्द करून कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे व इतर प्रश्न सोडविण्याची मागणी केली. बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र विक्रीकर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनां संपात सहभागी झाल्याने गुरूवारी दिवसभर कोकण भवनमधील कामकाजावर परिणाम झाला होता.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई