शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

तळोजा कारागृहातील कैद्यांचे डोळे पाणावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 1:21 AM

विविध गुन्ह्याअंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना अनेक दिवसांपासून आपल्या मुलांपासून दूर राहावे लागते. एकांतात शिक्षा भोगत असताना कुटुंबीयांपासून दूर राहावे लागते.

पनवेल : विविध गुन्ह्याअंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना अनेक दिवसांपासून आपल्या मुलांपासून दूर राहावे लागते. एकांतात शिक्षा भोगत असताना कुटुंबीयांपासून दूर राहावे लागते. प्रत्येक कैद्यांना आपल्या कुटुंबीयांना भेटायची इच्छा असते. त्यांची हीच इच्छा तळोजा कारागृहातील अधीक्षक सदानंद गायकवाड यांच्या पुढाकाराने गुरु वारी पूर्ण झाली. गळाभेट या उपक्रमाअंतर्गत निवडलेल्या ११ कैद्यांना आपल्या कुटुंबीयांसोबत भेट घडवून देण्यात आली.तळोजा कारागृह हे महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्यानंतर बांधलेले पहिले कारागृह आहे. २१२४ कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात सध्याच्या घडीला २५०० पेक्षा जास्त कैदी आहेत. विशेष म्हणजे कुख्यात गुंड डी.के.राव, अबू सालेम यांच्यासह भरत नेपाळी गँग, शरद मोहळ गँग, इंडियन मुजाहिद्दीन, मालेगाव बॉम्बस्फोट, छोटा राजन गँग, सिमीसह १९९३ बॉम्बस्फोटामधील आरोपी या कारागृहात आहेत. अनेक वेळा कैद्यांमधील भांडणाने चर्चेत येणारे तळोजा कारागृह आज कैद्यांची गळाभेट या अनोख्या कार्यक्र माच्या माध्यमातून चर्चेत आले. निवडक कैद्यांच्या कुटुंबीयाकरिता छोटेखानी कार्यक्र माचे आयोजन करून मुलांसोबत संवाद घडवून आणला. यावेळी कैदी आणि त्यांच्या मुलांच्या चेहºयावरून आनंद द्विगुणित झाल्याचे पहावयास मिळाले.कारागृहाचे अधीक्षक सदानंद गायकवाड यांनी एखादा आरोपी शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना देखील त्याची चिंता लागून राहिलेली असते. विशेषत: लहान मुलांवर याचे परिणाम होत असतात. या कार्यक्र माच्या आयोजनामागे कैदी व त्यांच्या मुलांचा संवाद हेच होते. कारागृहात काम करीत असलेले सामाजिक कार्यकर्ते अमर सावंत व संदीप दिघे यांच्या संकल्पनेतून हा उपक्र म राबविण्यात आला.लक्ष्मण पवार या कैद्याने आपल्या भावना व्यक्त करताना खरोखरच आजचा दिवस मला एखाद्या सणासारखा वाटतोय. राजेश पवार (६), नीलम पवार (४) या माझ्या मुलांना भेटून मला खूप आनंद झाला. अशाच प्रकारे अनिल पटेल (४७) हा कैदी याठिकाणी होता.

टॅग्स :jailतुरुंग