शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

By admin | Updated: June 29, 2017 02:57 IST

पनवेल महापालिकेमध्ये अपंगांच्या विविध मागण्यांबाबत व अतिक्रमण हटाव मोहिमेमधून अपंग व्यावसायिकांना कायमस्वरूपी वगळून

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महापालिकेमध्ये अपंगांच्या विविध मागण्यांबाबत व अतिक्रमण हटाव मोहिमेमधून अपंग व्यावसायिकांना कायमस्वरूपी वगळून, स्टॉल तोडल्याबाबतच्या चर्चेसाठी अमरावतीचे आमदार बच्चू कडू पनवेलला आले होते. आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली व अपंग निधीचे वाटप करून देणार असल्याचे मान्य केले असल्याची माहिती, रवींद्र खोत यांनी दिली. तसेच मार्केटमध्ये अपंगांनी स्टॉल लावावेत, असेदेखील आयुक्तांनी आमदार कडू यांना सांगितले.पनवेल महानगरपालिकेमध्ये प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये अपंगांचा तीन टक्के निधी राखीव ठेवून, तो अपंगांच्या कल्याणासाठी खर्च करण्यात यावा व या मागील वर्षाचा निधीचा बॅकलॉग भरून काढावा, जन्म-मृत्यू नोंदीप्रमाणे अपंगांची महानगरपालिकेमध्ये नोंद करणे, १९९५चा अपंग व्यक्ती कायदा राबविणे, भूखंड निवासी व व्यापारी गाळेवाटपामध्ये कायद्याप्रमाणे १९९६ पासूनचा अनुशेष तीन टक्केप्रमाणे भरून काढावा. अपंगांना व्यवसायासाठी बांधीव स्टॉल व जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अपंगांची तीन टक्केप्रमाणे नोकरभरती करण्यात यावी, निधीचे नियंत्रण करण्यासाठी समिती गठीत करून त्यामध्ये अपंगांना स्थान देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्यासोबत शिष्टमंडळ व आयुक्त शिंदे यांची चर्चा झाली.