शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची वेबसाईट एनआयसी सर्वरवर

By admin | Updated: July 17, 2017 01:35 IST

नवी मुंबई पोलिसांच्या वेबसाईटच्या होस्टिंगमध्ये बदल करण्यात येणार आहे. एचटीटीपीपेक्षा पीएचपी यूआरएलवर जास्त सुरक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या वेबसाईटच्या होस्टिंगमध्ये बदल करण्यात येणार आहे. एचटीटीपीपेक्षा पीएचपी यूआरएलवर जास्त सुरक्षा असल्यामुळे हा बदल केला जाणार आहे. चालू महिन्यात दोनदा हॅकर्सने वेबसाईट हॅक केल्यामुळे सुरक्षेकरिता पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.चालू महिन्यात दोनदा तुर्कीच्या हॅकर्सनी नवी मुंबई पोलिसांची वेबसाईट हॅक केली आहे. वेबसाईटची यूआरएल हॅक करून त्यावर तुर्कीचा झेंडा फडकवण्यात आलेला होता. मात्र दोन्ही वेळेस प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी सुमारे अर्ध्या तासात वेबसाईट हॅकर्सच्या तावडीतुन मुक्त करून पूर्ववत केलेली आहे. पहिल्यांदा हॅकर्सने केलेल्या या खोडसाळ कृत्यानंतर पोलिसांनी वेबसाईटच्या सुरक्षेची काळजी घेतली होती. मात्र त्यानंतरही दुसऱ्यांदा हॅकर्सने त्यांचे कर्तृत्व सिद्ध करत पुन्हा वेबसाईट हॅक केली. यामुळे भविष्यात पुन्हा त्यांच्याकडून वेबसाईट हॅक केली जाऊ नये या दृष्टीने नवी मुंबई पोलिसांनी पाऊल उचलले आहे. पोलिसांची वेबसाईट सार्वजनिक वापरासाठी असल्याने त्यासाठी एचटीटीपी यूआरएल वापरण्यात आला होता. मात्र या सर्वरवर उच्च दर्जाची सुरक्षा नसल्याचे हॅकर्सनी सिद्ध करून दाखवले आहे. ही बाब नवी मुंबई पोलिसांनी गांभीर्याने घेवून यूआरएलमध्ये बदल करण्याचे ठरवले आहे. गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी यांनी त्यास दुजोरा दिला आहे.नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरवर (एनआयसी) वापरल्या जाणाऱ्या पीएचपी सर्वरवर वेबसाईटच्या सुरक्षेची जास्त खात्री असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यासंबंधीची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर वेबसाईट हॅक होण्याचे टळेल असा पोलिसांचा विश्वास आहे. कोणतीही यूआरएल वापरली तरी, सर्वरचा फायरवॉल सक्षम असल्याशिवाय हॅकर्सला आळा बसणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.