शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
4
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
5
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
6
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
7
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
8
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
9
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
10
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
11
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
12
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
13
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
14
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
15
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
16
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
17
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
18
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
19
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
20
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

मुलांना शाळेत पाठविण्यास तालुक्यातील पालकांचा नकार, ऑनलाइन शिक्षणाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 01:58 IST

Crime News : पनवेल तालुक्यातील ५वी ते ८वी पर्यंच्या शाळा शिक्षण विभागाकडून २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश असले, तरी बहुतांश शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत.

कळंबाेली - पनवेल तालुक्यातील ५वी ते ८वी पर्यंच्या शाळा शिक्षण विभागाकडून २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश असले, तरी बहुतांश शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. काही शाळेतील शिक्षकांच्या कोरोना चाचणी झालेल्या नाहीत, तर काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दिला आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. १० महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पनवेल तालुक्यात ५वी ते ८वी पर्यंतच्या एकूण ४१७ शाळा आहेत, तर विद्यार्थी संख्या ७२,४५३ इतकी आहे. त्यानुसार बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत, तर महापालिका परिसरातील काही शाळा बंद आहेत. जि. प. शाळेसह खासगी शाळा सुरू करण्यासाठी पालकांकडून संमतीपत्र घेण्यात येत आहे. यास पालकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या भीतीने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनेच शिक्षण देण्याची मागणी काही पालकांकडून करण्यात येत आहे. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकाने संमतीपत्र देणे आवश्यक आहे. संमतीपत्र असल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत येता येणार नाही .त्यामुळे पालकांनी संमतीपत्र दिले तरच शाळा सुरू होतील, अशी स्थिती आहे.काटेकोर नियम पाळण्याची गरज कोरोना काळात बंद असलेल्या शाळा सुरू होत आहेत. शाळांना कोरोना संरक्षणाबाबतचे नियम घालून दिले आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. शाळा दररोज निर्जंतुकीकरण करणे, विद्यार्थी एका बाकावर एकच बसण्याची व्यवस्था करणे, सॅनिटायझर, मास्क, थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटर, साबण, पाणी या आवश्यक गोष्टींची उपलब्धता शाळा व्यवस्थापनाला करावी लागणार आहे. कोरोनाचा काळ पूर्णपणे संपलेला नाही. पनवेल परिसरात रुग्ण आढळत आहेत. लहान मुलांची जबाबदारी कोण घेणार?, शाळा सुरू करण्यासाठी आमच्याकडून संमतीपत्र घेत आहेत; पण मुलांच्या आरोग्याबाबत हमी घेत नसल्याने आम्ही पाल्यांना शाळेत पाठविणार नाही.- नरेश म्हात्रे, पालकशाळा सुरू झाल्या आहेत. संमतीपत्र देण्यास शाळेकडून सांगितले आहे. शैक्षणिक वर्षातले तीन महिने राहिले आहेत. पनवेल परिसरात कोरोनाचे संसर्ग रुग्ण सापडत आहेत. ऑनलाईन पद्धतीनेच शिक्षण सुरू ठेवावे. आम्ही तरी मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दिला आहे.- संजय पवार, पालक

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षणNavi Mumbaiनवी मुंबई