पनवेलमधील नगरसेवकाला धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:20 IST2017-08-04T02:20:43+5:302017-08-04T02:20:43+5:30

वाशी व जे. जे. रुग्णालयातून उपचारादरम्यान पळून गेलेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी हनुमान सदाशिव पाटील ऊर्फ प्रेम पाटील याला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

 Panvel in Panvel threatens | पनवेलमधील नगरसेवकाला धमकी

पनवेलमधील नगरसेवकाला धमकी

नवी मुंबई : वाशी व जे. जे. रुग्णालयातून उपचारादरम्यान पळून गेलेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी हनुमान सदाशिव पाटील ऊर्फ प्रेम पाटील याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याने पनवेलमधील नगरसेवकाकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
प्रेम पाटील कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा आरोप आहे. त्याला अटक केल्यानंतर जे.जे. रुग्णालयातून पळून गेला होता. त्यापूर्वी वाशी रुग्णालयातून पळून गेला होता. २४ जुलैला पनवेलमधील नगरसेवकाला २५ लाखांची सुपारी असल्याचे सांगितले. नगरसेवकाने याविषयी कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सापळा रचून प्रेम पाटीलला अटक केली. त्याला ८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या पथकाने केला असून या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title:  Panvel in Panvel threatens