शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन आराखड्याचा विषय सर्वसाधारण सभेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:52 IST

पनवेल महापालिकेची स्थापना झाली. पालिकेत खारघर, कळंबोली, कामोठे, खांदा वसाहत, नवीन पनवेल आदिंसह २९ गावांचा समावेश आहे.

पनवेल: पनवेल महापालिकेची स्थापना झाली. पालिकेत खारघर, कळंबोली, कामोठे, खांदा वसाहत, नवीन पनवेल आदिंसह २९ गावांचा समावेश आहे. पालिकेची व्याप्ती मोठी असल्याने आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पालिकेचा सक्षम असा आपत्कालीन आराखडा तयार करणे गरजेचे असताना पालिकेने पनवेल नगरपरिषदेचा आराखडा कॉपी करुन त्या आराखड्याला पनवेल महानगरपालिकेचा आपत्कालीन आराखडा नाव दिल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात लोकमतने दि. २६ रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर पालिका क्षेत्रातील रहिवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्याच्या दृष्टीने संपूर्ण पालिका क्षेत्राचा सर्वसमावेश आराखडा पालिकेने तयार करणे गरजेचे असताना पालिकेचा आराखडा केवळ पनवेल शहरापुरताच मर्यादित असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात येथील रहिवासी, लोकप्रतिनिधींना याबाबत नाराजी व्यक्त करीत आपल्या प्रतिक्रिया मांडल्या.आपत्कालीन आराखड्यासंदर्भात सर्वप्रथम माहिती घेतली जाईल, त्यानंतरच यासंदर्भात प्रतिक्रिया देणे उचित ठरेल.- डॉ. कविता चौतमोल,महापौर, पनवेल महानगरपालिकापनवेल महानगर पालिकेचे मनुष्यबळ देखील अपुरे आहे. अद्याप महापौर, उपमहापौर, विरोधकांना बसायला जागा नाही. पालिकेने आपत्कालीन आराखडा तयार करणे गरजेचे आहे. याकरिता पालिकेने पावले उचलली नसतील. सर्वसाधारण सभेत हा विषय आम्ही नक्कीच मांडू.- प्रीतम म्हात्रे,गटनेते शेकापआपत्कालीन आराखड्यात पनवेल शहर वगळता पालिकेत समाविष्ट असलेला ग्रामीण भाग, खारघर तसेच तळोजा औद्योगिक सारख्या महत्त्वाच्या परिसराचा काहीच विचार केला गेला नसल्याने हा आराखडाच हास्यास्पद आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी म्हणून पनवेलची निर्मिती करीत असताना अशाप्रकारच्या चुका पालिका प्रशासनाला शोभणाºया नाहीत.- गुरुनाथ गायकर,नगरसेवक, शेकापपनवेल पालिका क्षेत्रात कधीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते. मात्र पालिका याकरिता सक्षम नसल्याचे या आराखड्यावरुन सिध्द झाले आहे. त्यामुळे अशाप्रकारचे उदासीन धोरण पालिका राबवत असेल तर पालिका क्षेत्रातील रहिवाशांच्या जीवाला आपत्कालीन परिस्थितीला धोका निर्माण होवू शकतो.- संतोष तांबोळी,रहिवासी खारघर